Monday, September 21, 2026
Homeबीडगावगाडा हाकणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका..! - तब्बल २४ सरपंचासह ८२० ग्रामपंचायत...

गावगाडा हाकणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका..! – तब्बल २४ सरपंचासह ८२० ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी ठराविक मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असतांना कालावधी लोटूनही जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या तब्बल २४ सरपंचासह ८२० ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी रद्द करून गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जोरदार दणक्यासह झटका दिला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जातवैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करण्यास वारंवार नोटिसा बजावूनही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने सदरची कारवाई करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी गत २० जानेवारी रोजी जिल्ह्यातील आष्टी, अंबाजोगाई,वडवणी,पाटोदा, माजलगाव,केज व धारूर या ७ तालुक्यातील १३ सरपंच व ४१८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. त्यानंतर आता पुन्हा धडक कारवाई करीत ४ तालुक्यांतील ११ सरपंच व ४०२ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.त्यामुळे सदस्यत्व निलंबित करण्यात आलेल्या सरपंचांचा आकडा २४ वर,तर सदस्यांचा आकडा ८२० वर पोहोचला आहे.
माहितीतनुसार,२०२० ते २०२५ या कालावधीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य झालेल्या सदस्यांनी ठराविक मुदतीत आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते.अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव असणाऱ्या जागांवर निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या तारखेपासून १२ महिन्यांच्या आत सादर करणे बंधनकारक असते.मात्र,दिलेल्या मुदतीत सदस्यांनी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.त्यामुळे गावगाडा चालवणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिल्याचा दावा केला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!