Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरगायीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक अनियंत्रित; गायीसह गुराखी ठार..

गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक अनियंत्रित; गायीसह गुराखी ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिकडे पाहावे तिकडे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.विशेष म्हणजे,एकाच महामार्गावर सलग दुसऱ्यांदा अपघात घडल्याची घटना परत पुन्हा उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरबाहुली-मरारवाडी जवळ धावत्या कारचा टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली कार रोडवर कोलांटउड्या घेत पलटी झाल्याने कारमधील तिघांना गंभीर दुखापत झाल्याची घटना ताजी असतांनाच परत काल,गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्याच महामार्गावर जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरबाहुली परिसरात एका भरधाव वेगाने असणाऱ्या ट्रकने गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात गुराखी व गायीला जोरदार धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
माहितीनुसार,एमएच ४०सीएम ५७६५ क्रमांकाचा
रेती भरलेला ट्रक जबलपूरहून नागपूरकडे निघालेला  होता.अशातच सायंकाळच्या सुमारास एक गुराखी जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरबाहुली परिसरातून जनावरे चारून परत येत असतांना कळपातील एक गाय महामार्गावर अचानक शिरली. त्यामुळे  ट्रक चालकाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला.मात्र,ट्रक भरधाव वेगाने असल्याने चालकाने  ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला असता अनियंत्रित ट्रकने गायीसह गुराखीलाही चिरडले व नंतर ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.अपघातात गायीचा आणि गुराखीचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान,ट्रकचालक आरिफ खान वय ३० वर्षे व सहकारी सोहेल खान वय २१ वर्षे हे दोघेही अपघातातून थोडक्यात बचावले. सहकारी यांस किरकोळ दुखापत झाल्याने त्याला मनसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच चोरबाहुलीचे पोलिस पाटील योगेश कंगाली यांनी ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी व देवलापार पोलिसांना कळवले.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून ट्रकचालकाला ताब्यात घेत घटनेचा पुढील तपास रामटेक पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!