उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे फक्त शिपाईच नाही तर सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील.जे कर्मचारी आता सेवेत आहेत ते निवृत्त होईपर्यंत राहतील.पण त्यांची जागा रिक्त झाल्यावर त्यापुढे त्यांच्या जागेवर कंत्राटी भरती केली जाणार आहे,अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज,गुरुवारी ३ जुलै रोजी विधानपरिषदेत केली.कंत्राटी पद्धतीने भरतीची घोषणा केल्याने विधानपरिषदेत चांगलाच गदारोळ झाला.विरोधकांनी शाळांमध्ये शिपाई यांची पदे ही कायमस्वरूपाचीच झाली पाहिजे.अशी मागणी करत विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला.तसेच मंत्री दादा भूसेंकडून उत्तर अपेक्षित आहे अशी मागणी केली. अनेक शाळांमध्ये सर्वत्र जास्त मुली शिक्षण घेत असतात.एरवी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.त्यामुळे कायमस्वरुपी भरती झाली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली.शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या,शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून याबाबत आवश्यक त्या उपाययोजना राबवित आहे.यु-डायस (UDISE) प्राणलीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी म्हटले आहे.
आता शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती होणार कंत्राटी पद्धतीने..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

