चंद्रपूर :-कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना कोठारी पोलिस ठाणे अंतर्गत कुडेसावली येथे काल, गुरुवारी १२ सप्टेंबरच्या सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.वंदना धनपाल रामटेके वय ६० वर्षे, रा. कुडेसावली असे मृत महिलेचे नाव आहे.पोलिसांनी आरोपी पती धनपाल रामटेके वय ६७ वर्षे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.महिलेला वाचविण्यासाठी धावणाऱ्या शेजाऱ्यांवरही आरोपीने चाकू उगारल्याची माहिती पुढे आली आहे.
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची चाकूने भोसकून केली हत्या…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
बल्लारपूर तालुक्यातील कुडेसावली येथील धनपाल रामटेके व पत्नी वंदना यांच्यात कौटुंबिक कलहातून नेहमीच वाद होत होते.गुरुवारी सकाळी मोठा मुलगा चंद्रपूरला गेला.त्यानंतर काही वेळातच त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला.दरम्यान,वंदना ही भांडे घासत असताना धनराजने धारदार चाकूने तिच्या पाठीत वार केले.घाबरून लगेच मागे वळली असता त्याने पुन्हा चाकू पोटात भोसकला.त्यानंतर हात समोर केला असता हातावरही चाकूने वार केला.रक्ताच्या थारोळ्यात वंदना ह्या जमिनीवर कोसळल्या. शेजाऱ्यांनी तिला कोठारी येथील रुग्णालयात नेले. मात्र,तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने बल्लारपूर येथे हलविण्यात आले.मात्र,वाटेतच तिचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच कोठारीचे ठाणेदार योगेश खरसान घटनास्थळावर दाखल झाले.त्यांनी घटनेचा पंचनामा करून आरोपी धनपाल रामटेके याला अटक केली.मृत वंदना ही कर्करोगग्रस्त असल्याची चर्चा गावकऱ्यांत सुरू आहे.
वंदना ही घरात भांडे घासत असताना धनपालने तिला चाकूने भोसकले.ती खाली कोसळताच तिला उचलून घरासमोरील रस्त्यावर टाकले.शेजाऱ्यांना याबाबतची माहिती होताच ते तिला वाचवायला गेले.मात्र धनपालने तोच चाकू त्यांच्यावर रोखून धरला.कुणी वाचवायला आले तर त्यांनाही मारण्याची धमकी दिली.त्यामुळे बराच वेळ कुणी तिच्या मदतीला जाऊ शकले नाही.घटनास्थळी नागरिकांची संख्या वाढल्यानंतर काहींनी हिंमत करून तिला कोठारी रुग्णालयात भरती केले.त्यानंतर बल्लापूरला नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

