Saturday, June 20, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे काँग्रेस नेते रामदास मसराम आयोजित रक्तदान शिबिर संपन्न...

कोंढाळा येथे काँग्रेस नेते रामदास मसराम आयोजित रक्तदान शिबिर संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(देसाईगंज):- ‘मिळेल एखाद्यास जीवदान आपण केल्यास रक्तदान’ या म्हणीप्रमाणे आज, मंगळवार दिनांक-२७ ऑगस्टला कोंढाळा ग्रामपंचायतीच्या समाज मंदिर सभागृहात सकाळी १० वाजेच्या सुमारास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम यांच्या वतीने भव्य-दिव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच गाडगे महाराज यांच्या प्रतीमेसमोर गावातील प्रतिष्ठित नागरिक मारोती तुपट यांनी दीपप्रज्वलन करून माल्यार्पण केले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंतांच्या प्रतीमेस माल्यार्पण करण्यात आले. ‘रक्तदान हेच खरे श्रेष्ठ दान’ या दानाशिवाय कुठलेही मोठे दान नाही. रक्तदान शिबिरांमध्ये जी व्यक्ती रक्तदान करते; अशांना रक्तदानाचे कार्ड दिल्या जाते.एखादेवेळी एखाद्या गरजू व्यक्तीला रक्ताची गरज भासल्यास मिळालेले रक्तदान कार्ड शासकीय रुग्णालयांमध्ये घेऊन जाऊन तात्काळ संबंधित व्यक्तींना रक्त उपलब्ध करून देण्यात येतो. रक्तदात्यांमुळे आज अनेकांचा जीव वाचलेला असल्याने जास्तीत-जास्त नागरिकांनी रक्तदान करणे आवश्यक आहे; असे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम शिबिर प्रसंगी बोलत होते. रक्तदान शिबिरात तब्बल २१ रक्तदात्यांनी रक्तदान केलेत.तर माने मेडिकल फाऊंडेशन एसबीआय संजीवनी फिरता दवाखाना अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला. आरोग्य तपासणी शिबिरात गावातील शेकडोच्यावर नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
आयोजित शिबिर प्रसंगी गावच्या प्रथम नागरिक सरपंचा अपर्णा राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,प्रा.पंकज धोटे,माजी उपसभापती नितीन राऊत,पोलीस पाटील किरणताई कुंभलवार,ग्रामसेविका मेघना राऊत,तंटामुक्त समिती अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,ग्रामपंचायत सदस्य प्रफुल मेश्राम,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,मारोती तुपट,दिगांबर भजनकर,बाबुराव राऊत,अंगणवाडी सेविका,मदतनीस,ग्रामपंचायत कर्मचारी तथा गावातील नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला.
सदर शिबिराच्या यशस्वितेसाठी सागर वाढई,स्वप्नील मिसार,गौरव शिलार,मोहित राऊत,निशांत वनमाळी, अनुज घोसे,तेजस नवघडे,आशुतोष भरणे,जितू चौधरी, लंकेश ढोरे,उमाकांत दोनाडकर,गोपाल दोनाडकर,अमर भर्रे,चारुदत्त राऊत,रोशन कावासे,आकाश पेटकुले आदींनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!