Friday, May 1, 2026
Homeनागपूरबाळाला विकण्यामागे आईने सांगितली आपबिती...

बाळाला विकण्यामागे आईने सांगितली आपबिती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने नवजात मुलाच्या विक्रीच्या प्रकरणाचा भंडाफोड केल्यानंतर खळबळ उडाली होती.सूत्रांच्या माहितीनुसार,गरिबीच्या चटक्यांमुळे आईने पोटचे बाळ विकण्याचा निर्णय घेतला होता.तिचा पती मद्यपी असून,दारूच्या व्यसनातच सर्व पैसे खर्च करतो. अशा स्थितीत अगोदरच दोन मुलांच्या संगोपनाचा भार असलेल्या मातेने अनिच्छेने हे पाऊल उचलले.पत्नी गरोदर असल्याचे समजल्यापासूनच मद्यपी पती ग्राहक शोधण्याच्या मागे लागला होता.
पत्नी श्वेता अगोदर मोलमजुरी करायची.मात्र,मुलगी लहान असल्यामुळे तिने काम सोडले,तर पती सुनील गेंडरे भाजी विकायचा.मात्र, lदारूच्या नादात त्याच्या कामाचा ठावठिकाणाच राहिला नाही.त्यांना चार वर्षांचा मुलगा व दोन वर्षांची मुलगी आहे.सासूने दोघांनाही कळमना येथील घरात आसरा दिला आहे. घरात मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या सासूमुळे या दाम्पत्याला आणि मुलांना दोन वेळचे जेवण मिळत होते.दरम्यान,गरोदर राहिल्याने श्वेता तणावात होती. वेळ निघून गेल्यामुळे गर्भपातदेखील शक्य झाला नाही.दारुड्या पतीने त्याच्या आईलाच पैसे मागितले. मात्र,तिने नकार दिला.बाळाचे संगोपन कसे होईल,या विचारात श्वेता असताना सुनीलने बाळ विकत घेण्यास इच्छुक असलेल्या लोकांचा शोध सुरू केला.
या जोडप्याने त्यांची समस्या त्यांच्या ओळखीची महिला किरण इंगळे वय ४१वर्षे,रा.पांढराबोडी हिला सांगितली.किरणची बहीण पौर्णिमा वय ३२ वर्षे व तिचा पती स्नेहदीप शेळके वय ४५ वर्षे, रा.बदलापूर यांना मूल दत्तक घ्यायचे होते.किरणने तिचा पती प्रमोद इंगळे याच्या मदतीने शेळके दाम्पत्याला संपर्क साधला.त्यांनी बाळ घेण्यास होकार दिला.१८ ऑगस्टला डागा रुग्णालयात श्वेताने मुलाला जन्म दिला.किरणने त्यांना आवश्यक खर्चासाठी १० हजार रुपये दिले.दोन्ही मुलांच्या संगोपनासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येईल,असे सांगितले.२२ ऑगस्ट रोजी किरण प्रमोदसह कळमना येथे श्वेता-सुनीलच्या घरी पोहोचली व बाळाला घेऊन परत आली.काही दिवसांनी दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन तिने दिले.दरम्यान,हा सौदा उघडकीस येताच मानवी तस्करीविरोधी पथकाने कारवाई केली.सहाही आरोपींविरोधात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण)अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्यांना कळमना पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे; तर बाळाला श्रद्धानंद अनाथालयात तात्पुरते ठेवण्यात आले आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!