Saturday, June 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनवीन फौजदारी कायद्यांमुळे आता देशभरात कुठूनही करता येणार पोलिसांत ई-तक्रार... - नव्या...

नवीन फौजदारी कायद्यांमुळे आता देशभरात कुठूनही करता येणार पोलिसांत ई-तक्रार… – नव्या कायद्यात ऑन कॅमेरा घेण्याची तरतूद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नवीन फौजदारी कायद्यांमुळे आता नागरिकांना देशभरात कुठूनही ई-तक्रार करता येणार आहे.ई- तक्रारीवरून पोलिस प्राथमिक तपास सुरू करून पुरावे जमा करतील; मात्र त्यानंतर तीन दिवसांत पीडितांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करणे आवश्यक आहे.त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

मोबाईलवर ‘Maharashtra Police- services for Citizen या संकेतस्थळावर नागरिकांना ई- तक्रार नोंदविता येते.मात्र तीन दिवसानंतर संबंधित ठाण्यात जाऊन एफआयआरवर सही मारावी लागते.
भारतीय दंड संहितेऐवजी भारतीय न्यायसंहिता असे नवीन कायदे-कलम १ जुलै २०२४ पासून देशात लागू झाले आहेत.त्यानुसार आता तत्काळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करता येणे अडचणीचे असेल तर ऑनलाईन तक्रार करता येते.
तक्रारकर्त्यांचा जबाब,त्या आधारे नोंद होणारे दखलपात्र गुन्हे,पुरावे गोळा करताना बंधनकारक असलेले पंचनामे,साक्षीदार आणि आरोपींचे जवाब,शोधमोहीम, झडती,जप्ती,अटक आदी सर्व प्रक्रिया ऑन कॅमेरा घेण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे.
झीरो एफआयआरद्वारे नागरिक कुठूनही आपली तक्रार नोंदवू शकतात.पुढे,तो गुन्हा संबंधित पोलिस ठाण्यात तपासासाठी वर्ग होईल; याशिवाय ई-तक्रार करण्याची सुविधा या कायद्यांतर्गत आहे.ई- तक्रारीवरून पोलिस प्राथमिक तपास सुरू करून पुरावे गोळा करतील.तीन दिवसांत पीडित तक्रारदार याला पोलिस ठाण्यात जाऊन तक्रारीवर सही करणे आवश्यक आहे.त्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल..
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!