Friday, October 16, 2026
Homeनागपूरकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नागपूर कार्यालयात धमकीचे फोन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नागपूर कार्यालयात धमकीचे फोन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील ऑरेंज सिटी चौकातील जनसंपर्क कार्यालयात परत एकदा धमकीचे फोन आल्यामुळे खळबळ माजली आहे. या धमकीमुळे पोलिसांनी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवून फोन करणाऱ्याचा तपास सुरु केला आहे. दोन महिन्यात दुसऱ्यांदा गडकरींच्या कार्यालयात धमकीचा फोन आल्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळी अकरा वाजताच्या सुमारास धमकीचा पहिला कॉल आला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या घटनेनंतर तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जनसंपर्क कार्यालय गाठत माहिती घेतली. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सी-20 चा समारोप आहे.गडकरी यांच्या उपस्थितीत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षाविषयक विशेष काळजी घेतली जात आहे.एटीएसच्या पथकानेही कार्यालयाला भेट देऊन माहिती घेतली.

आज सकाळी दोनदा गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे कॉल आले.धक्कादायक म्हणजे पुन्हा एकदा जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे कॉल आले आहेत.त्यानंतर नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नागपूर पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचे कॉल आल्याची माहिती दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!