Saturday, September 12, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा तहसील कार्यालयासमोर भर उन्हात काँग्रेसचे बेमुदत उपोषण आंदोलन.. - आधारभूत धान...

कुरखेडा तहसील कार्यालयासमोर भर उन्हात काँग्रेसचे बेमुदत उपोषण आंदोलन.. – आधारभूत धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करण्याची मागणी.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील रब्बी धान आधारभूत खरेदी केंद्र अद्याप सूरू न झाल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना मिळेल त्या किंमतीत धान्य खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्रे तातडीने सूरू करण्यात यावे या मागणी करीता आज,सोमवार १९ मे रोजी भर उन्हात दुपारी १२ वाजेपासून कुरखेडा तहसील कार्यालय समोरे कांग्रेस पक्षाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
शासन आदिवासी विकास महामंडळ संस्थांमार्फत शासकीय आधारभूत धान खरेदी योजना राबविते. मात्र,रब्बी(उन्हाळी) धानपीक निघून जवळपास १५ दिवसांचा कालावधी लोटूनही महामंडळ प्रशासनाच्या  दिरंगाईमुळे शासकीय धान खरेदी केंद्रे अद्यापही सुरू होऊ शकले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची खाजगी व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याने ऑनलाईन नोंदणी करीता खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्यात यावीत, या  मागणीला घेऊन सदर आंदोलन आज सोमवारी सुरू  करण्यात आले आहे.मागण्यासंदर्भात मोठी नारेबाजी करीत शासनाचे लक्ष वेधण्यात आले.मागण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. सदर आंदोलनाचे नेतृत्व तालुका कांग्रेस अध्यक्ष जिवन पाटील नाट,जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे,माजी जि.प.सदस्य प्रभाकर तुलावी,माजी पं.स.सभापति गिरीधर तितराम,माजी उपसभापति श्रीराम दुगा,कुरखेडा युवक कांग्रेस अध्यक्ष प्रांजल धाबेकर,दामोधर वट्टी,तुकाराम मारगाये,सुरेश गावतुरे,उस्मान खान,मोहन कुथे,धर्मदास उईके,भावेश मुंगणकर,अनिल ठाकरे, पुंडलीक निपाने,मंगेश वालदे,दिवाकर मारगाये,तेजराम सहारे,रेषीम माकडे,विठ्ठल प्रधान,हरीदास नाकतोडे, विनोद माकडे,अगरसिंग खडाधार,आनंदराव जांभूळकर, संदेश कोटागंले, अशोक डोंगरवार,निलकंठ आलाम, रूपचंद आळे,छगण आडील,गजानन घुगवा,राहूल कपूर,मदन वट्टी, नानाजी वालदे,अरूण उईके,रोहित ढवळे,राजेश आत्राम,मोहन नंदेश्वर,विजय कुथे,दिनकर माकडे सह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!