Wednesday, September 2, 2026
Homeगोंदियाकारवरील नियंत्रण सुटून अपघात; अपघातात कार चालक व शेजारील तरुण जागीच ठार..

कारवरील नियंत्रण सुटून अपघात; अपघातात कार चालक व शेजारील तरुण जागीच ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-एकाच शहरातील रहिवासी तरुणांचा कारवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना आज,मंगळवार १ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास देवरी तालुक्यातील परसटोला शिवारातील वन विभागाच्या नाक्याजवळ घडली.अपघातात कार चालक व चालकाच्या शेजारील सिटवर बसलेला तरुण जागीच ठार झाले तर मागच्या सिटवर बसलेला तरुण समोरच्या व मागच्या सिटमध्ये अडकून गंभीर जखमी झाला.अपघात भीषण होता की,गॅस वेल्डिंगने कटिंग करून मृतास व जखमीस कारच्या बाहेर काढावे लागले.अपघातात ३३ वर्षीय सोहेल शेख व ३४ वर्षीय राजा भारती यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर २४ वर्षीय सलमान शेख याच्या पायाचे हाड मोडले.
तिघेही तरुण देवरी शहरातील रहिवासी होते.पहाटेची घटना असल्यामुळे तीन तासानंतर मदत मिळाली.
देवरी शहरातील तीन तरुण सीजी०८आर ६२५५ क्रमांकाच्या कारने देवरी चिचगड मार्गावरून देवरीकडे येत होते.चालकाचे परसटोला शिवारातील वन विभागाच्या नाक्याजवळ स्टेरिंगवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यालगत असलेल्या बीजाच्या झाडाला जाऊन धडकली.या अपघातात कार चालक व चालकाच्या शेजारच्या सिटवर बसलेला तरुण जागीच ठार झाले.मागच्या सिटवर बसलेला तरुण समोरच्या व मागच्या सिटमध्ये अडकला.देवरी शहरालगत अपघात झाल्याने पोलीस तसेच नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी गोळा झालेल्या नागरिकांनी कारमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.मात्र,त्यांना बाहेर काढता येत नव्हते.त्यामुळे गॅस वेल्डिंगने कटिंग करून,मृतास व जखमीस पोलीस कर्मचारी व नागरिकांनी बाहेर काढले.जखमीला १०८ रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले.देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जखमी तरुणाला पुढील उपचाराकरिता गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.घटनेचा
पुढील तपास देवरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गेडाम सह पोलीस शिपाई करंजेकर करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!