Thursday, October 22, 2026
Homeभंडाराओल्या भिंतीवर माकडाने उडी मारताच अंगावर भिंत कोसळून तरुणाचा मृत्यू…

ओल्या भिंतीवर माकडाने उडी मारताच अंगावर भिंत कोसळून तरुणाचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- पावसामुळे घराची भिंत ओली होती. त्यातच अचानकपणे शेतशिवारातून आलेल्या माकडांच्या कळपातील एका माकडाने भिंतीवरून उडी मारली.यात भिंत कोसळून मलब्याखाली दबून एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.योगेश खुशाल देशमुख,रा. करांडला,ता.लाखांदूर असे मृताचे नाव असून ही घटना,रविवार ७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली.

शौचालय व राहत्या घराच्या मधात असलेल्या मोकळ्या जागेत ही भिंत कोसळली.मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे तालुक्यातील विविध गावांतील मातीने बनविलेल्या बहुतांश घरांचे पावसाच्या पाण्याने नुकसान झाले आहे.रविवारी योगेश स्वतःच्या राहत्या घराच्या घरगुती उपयोगातील शौचालय व मोठ्या भावाच्या मातीने बनविलेल्या घराच्या मध्यात असलेल्या मोकळ्या जागेत अस्ताव्यस्त पडलेल्या विटा व दगड निवडत होता.यावेळी अचानक शेतशिवारातून गावात प्रवेश केलेल्या माकडाने योगेशच्या मोठ्या भावाच्या राहत्या घरावर उडी घेतली.

माकडाने उडी घेताच योगेशच्या अंगावर भिंत पडली. या घटनेत योगेश गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती योगेशच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांच्या लक्षात येताच भिंतीच्या मलब्याखाली दबलेल्या योगेशला बाहेर काढत घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली.पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह गोमलाडू व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!