Monday, September 21, 2026
Homeबीडऐन कामगार दिनाच्या दिवशीच महिला मजुरांवर काळाचा घाला.. - पिकअप वाहन उलटून...

ऐन कामगार दिनाच्या दिवशीच महिला मजुरांवर काळाचा घाला.. – पिकअप वाहन उलटून तीन महिला ठार तर १५ जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन साजरा होत असतांनाच महिला मजुरांवर काळाने घाला घातल्याची घटना आज,गुरुवार १ मे रोजी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव परिसरात घडली.कांदा काढणीला पिकअप वाहनात बसून जात असतांना पिकअप वाहनाचे टायर फुटल्याने वाहन उलटून तीन महिला ठार झाल्या तर १५ महिला मजूर जखमी झाल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की,आज गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी पिकअप वाहनाने १९ ते २० महिला मजूर जात होत्या.अशातच बीड ते अहिल्यानगर मार्गावरील धामणगाव परिसरात वाहनाचे टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यात घटनेच्यावेळी १९ ते २० मजूर महीलांपैकी ३ महिला जागीच ठार झाल्या तर १५ महिला जखमी झाल्या. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.बऱ्याच मजूर महिलांना मार लागल्याने एकच रडारड सुरू होती तर जेवणाचे डब्बे व इतर साहित्य रस्त्यावर पडलेले होते.पोलिसांनी तात्काळ जखमी महिलांना लगतच्या रुग्णालयात हलविले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!