- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आरक्षण आणि क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला आहे.या निर्णयाला आरक्षण बचाओ संघर्ष समितीकडून विरोध केला जातो आहे.अनेक संघटनांनी उद्या म्हणजेच २१ ऑगस्टला भारत बंदची हाक दिली आहे.त्यानुसार उद्या सार्वजनिक वाहतूक आणि खासगी संस्था बंद राहणार आहेत.
या बंदमध्ये रुग्णवाहिकेसारख्या आपात्कालीन सेवा सुरू राहतील.जवळपास सर्व एससी,एसटी प्रवर्गातील नागरिकांनी या बंदला पाठिंबा दिलाय.एका वृत्तानुसार, सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्याचे आदेश जारी केलेत.अनेक भागांमध्ये बंदचा व्यापक परिणाम होऊ शकतो.
सर्वोच्च न्यायालयाच्या संवैधानिक खंडपीठाने १ ऑगस्ट रोजी आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता.ज्यामध्ये सर्व राज्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (SC/ST) मध्ये उपश्रेणी तयार करण्याची परवानगी देण्यात आली होती.आरक्षणाचा लाभ सर्वप्रथम ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना द्या; असे न्यायालयाने म्हटले होते.त्यानंतर या निर्णयाला विरोध होत आहे.या निर्णयाला आव्हान देणे आणि तो मागे घेण्याची मागणी करणे हा बंदचा मुख्य उद्देश आहे.
- Advertisement -

