Wednesday, July 29, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा ग्रामपंचायतीची ग्रामसभा पहिल्यांदाच शांततेत पडली पार.... -तब्बल १५ वर्षांपासून बिनविरोध तंटामुक्त...

कोंढाळा ग्रामपंचायतीची ग्रामसभा पहिल्यांदाच शांततेत पडली पार…. -तब्बल १५ वर्षांपासून बिनविरोध तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी हरिभाऊ पत्रे यांची निवड…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(देसाईगंज) :-ग्रामसभा म्हटले की,मुक्या माणसालाही वाचा फुटते; असा अनेक गावांतील ग्रामसभेतील प्रकार हल्ली निदर्शनास येऊ लागला आहे.काही ठिकाणी सकाळी सुरू झालेली ग्रामसभा रात्री उशिरा पर्यंत सुरू असते.गावातील घरकुलाचा विषय असला तर ग्रामसभेत तुफान गर्दी आढळून येते.मात्र,इतर वेगळे विषय असले की,कोरम अभावी ग्रामसभा तहकूब केली जाते.अशातच आज,मंगळवार २० ऑगस्ट रोजी देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायतीची ग्रामसभा पहिल्यांदाच शांततेत पार  पडली असल्याचे दिसून आले.
ग्रामपंचायत समाज मंदिराच्या सभागृहात दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या ग्रामसभेत सर्वप्रथम कृषी सहाय्यक तुळसकर यांनी कृषी योजना विषयी तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांविषयी गावातील नागरिकांना माहिती दिली.त्यानंतर मागील सभेच्या कार्यवृत्ताचे वाचन करण्यात आले.महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गठीत करून समितीच्या अध्यक्षाची निवड करण्यात आली.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२५-२६ करीता आराखडा तयार करणे, विविध शासकिय पत्राचे व जनतेच्या प्राप्त अर्जाचे वाचन करून निर्णय घेणे,विविध शासकिय योजनेअंतर्गत कामाची निवड करून अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय प्रामुख्याने घेण्यात आले.महत्वाचे म्हणजे,गावातील तंटामुक्त गाव समिती आजही सक्रिय असून गावातील विविध समस्यांचे आजही निराकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे.समितीच्या वतीने महिन्यातील एक तारीख ठरवली जाते व आलेल्या तक्रारी,तंटे व इतर अर्जांवर सभा आयोजित करून न्याय निर्वाळा केला जातो.अशातच एक ते दोन अध्यक्ष पद सोडले तर तब्बल १५ वर्षांपासून बिनविरोध तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी हरिभाऊ पत्रे यांची निवड करण्यात आली आहे.आज झालेल्या ग्रामसभेतही तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी हरिभाऊ पत्रे यांना नियुक्त करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.झालेल्या ग्रामसभेत कुठल्याही प्रकारचा गोंधळ वा इतर बाबी दिसून न आल्याने अगदी शांततेने कोंढाळा ग्रामपंचायतीची ग्रामसभा पहिल्यांदाच शांततेत पार पडल्याचे दिसून आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!