Wednesday, May 27, 2026
Homeमुंबईउंच इमारतीवर काम करतांना तोल गेला; एकाचा मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी..

उंच इमारतीवर काम करतांना तोल गेला; एकाचा मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-शहराच्या एका निर्माणाधीन उंच इमारतीवर काम करण्याऱ्या सहा मजुरांचा तोल जाऊन एकाचा मृत्यू झाला,तर पाचजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज, शनिवार २८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास चेंबूरच्या सुभाष नगर भागात घडली.रामाल्लू नामक ५५ वर्षीय कामगाराला डॉक्टरांनी मृत घोषित केले.तर उर्वरित पाच कामगारांवर सध्या उपचार सुरू आहेत.यात २२ वर्षीय कामगार गुनाधर राय हा गंभीर जखमी असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.याशिवाय ३० वर्षीय उसराई, २५ वर्षीय रमेश राय,३५ वर्षीय विजय व २७ संदीप अशी जखमींची नावे आहेत.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुभाष नगर येथील एका इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने कामगार नेहमीप्रमाणे काम करत होते. इमारतीच्या ६ व्या व ८ व्या मजल्यावर विटांचे बांधकाम करत असतांनाच सहा कामगारांचा अचानक तोल गेला आणि ते जवळपास ७० ते ८० फूट उंचीवरून खाली कोसळले.यात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बांधकामस्थळी असणारे इतर कामगार व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सर्वच कामगारांना त्यांनी तातडने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरील पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.विशेष म्हणजे,उंच इमारतीवर काम करत असतांना हेल्मेट,सेफ्टी बेल्ट व नेट असणे अनिवार्य आहे.मात्र,या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!