Thursday, April 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअतिरिक्त शुल्क घेणारा स्टॅम्प विक्रेता एसीबीच्या जाळ्यात..

अतिरिक्त शुल्क घेणारा स्टॅम्प विक्रेता एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतीच्या कामासाठी स्टॅम्प पेपरची खरेदी करणाऱ्या एका शेतकऱ्यास शासकीय स्टॅम्प विक्रेत्याने ६०० रुपये अतिरिक्त शुल्काची मागणी करून ५०० रुपयांवर तडजोड केली.प्रकरणी एसीबीच्या पथकाने सापळा रचून ५०० रुपयांसाठी एका शासकीय स्टॅम्प विक्रेत्यास पंचासमक्ष रंगेहाथ अटक केली आहे. सदरची कारवाई ही अकोला जिल्ह्याच्या बाळापुर तहसिल कार्यालय परिसरात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली. श्याम वंसत देशपांडे वय ५५ वर्षे,व्यवसाय-शासकीय स्टॅम्प विक्रेता तहसिल कार्यालय बाळापुर,रा.गणेश मंदीरजवळ,जुने शहर किल्ला विभाग, ता.बाळापुर,जि.अकोला असे अटक करण्यात आलेल्या स्टॅम्प विक्रेत्याचे नाव आहे.विशेष म्हणजे,स्टॅम्प विक्रेत्यांना शासकीय दरानुसारच स्टॅम्पची विक्री करणे अनिवार्य असतांनाही काहीजण जास्तीचे पैसे घेतांना दिसून येतात.यासाठी एखादा दणका मिळणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांना शेतीच्या कामाकरीता ५०० चे ४ स्टॅम्प व १०० चे १० स्टॅम्प पेपरची आवश्यकता होती.त्यामुळे,१५ ते २० दिवसांपूर्वी तक्रारदार हे स्टॅम्प विक्रेता श्याम देशपांडे यांना भेटले.त्यानुसार,देशपांडे यांनी ५०० चे ४ स्टॅम्प २ हजार रुपयांचे होत असतांना २ हजार ४०० रुपयांची मागणी केली.तर १०० चे १० स्टॅम्प पेपर १ हजार रुपयांत होत असतांना २०० रुपये अतिरिक्त म्हणजेच १ हजार २०० रुपयांची मागणी केली.संपूर्ण स्टॅम्प पेपर ३ हजार रुपयांचे होत असतांना ६०० रुपये अतिरिक्त शुल्काची मागणी केल्याने तक्रारदार यांनी गुरुवार २६ फेब्रुवारीला अकोला येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.सदर तक्रारीवरुन शुक्रवार,२७ फेब्रुवारी रोजी बाळापुर तहसिल कार्यालयात लाच मागणी पडताळणी करण्यात आली.सदर लाच मागणी पडताळणी कार्यवाही दरम्यान स्टॅम्प विक्रेत्याने ३ हजार ५०० रुपये स्विकारून त्यामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता ५०० रुपये लाच रक्कम स्विकारल्याने स्टॅम्प विक्रेता श्याम देशपांडे याचेविरूध्द बाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई बापु बांगर पोलीस अधीक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो,अमरावती परिक्षेत्र(९०११३२३४२६),  सचिंद्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो,अमरावती परिक्षेत्र (९७६४२१०४८५) यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंदकुमार बहाकर पोलीस उपअधिक्षक लाप्रवि.अकोला(९१५८८२२६७६), पोलीस हवालदार दिगांबर जाधव,अविनाश पाचपोर, पो.अ.गोपाल किरडे,संदिप ताले,नितीन पाटील, मपोहवा.अर्चना घोडेस्वार,चालक पोहवा सलीम खान, नफिस शेख सर्व ला.प्र.वि.अकोला यांनी पार पाडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!