Tuesday, September 8, 2026
Homeनागपूरआरोपींनी 'त्याला' घेरले अन् दगडाने डोके ठेचून मारले..

आरोपींनी ‘त्याला’ घेरले अन् दगडाने डोके ठेचून मारले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जुगार अड्ड्याचा वाद विकोपाला गेल्यानंतर नंदनवन येथील पडोळेनगर चौकात विरोधी गटातील आरोपींनी एका गुंडाची दगडाने डोके ठेचून हत्या केल्याची घटना काल,रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.त्यामुळे परिसरात दहशत पसरली होती.विकेश सुखदेव जाधव वय ३२ वर्षे असे मृताचे नाव असून,तो शास्त्रीनगर येथील रहिवासी होता. डंभा,प्रभाकर व त्यांच्या साथीदारांनी विकेशची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे. विकेशविरुद्ध हत्या,मकोका असे विविध गंभीर गुन्हे दाखल होते.आरोपीही कुख्यात गुन्हेगार असून, त्यांच्या विरुद्धदेखील हत्या व इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.डंभाला हद्दपारही केले गेले होते.तो जुगार अड्डा चालवीत होता.त्यावरून त्याचा विकेशसोबत वाद सुरू होता.काही दिवसांपूर्वी विकेशने डंभावर प्राणघातक हल्ला केला होता.त्यामुळे डंभाने विकेशचा काटा काढण्याचा निश्चय केला होता.
विकेश पडोळेनगर चौकात असताना आरोपींनी त्याला घेरले व त्याची दगडाने डोके ठेचून हत्या केली. त्यानंतर आरोपी फरार झाले.नंदनवनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोपट धायतोंडे हे आरोपींचा शोध घेत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!