Wednesday, April 15, 2026
Homeआरमोरीआरमोरी येथे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते ई-टॉयलेट लोकार्पण सोहळा संपन्न..

आरमोरी येथे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते ई-टॉयलेट लोकार्पण सोहळा संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहातील अस्वच्छतेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत असताना,आता शहरात स्वच्छ आणि तंत्रज्ञानावर आधारित स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत.शहरात चार ठिकाणी ई-टॉयलेट चा आज,११ सप्टेंबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.शहरात पहिल्यांदाच आरमोरी नगरपरिषद यंत्रणेने ई-टॉयलेट उभारणीसाठी पुढाकार घेत आरमोरी शहराच्या नवीन बस स्थानक परिसर, आठवडी बाजार,शास्त्रीनगर शेगांव वार्ड क्रमांक-२ व अरसोडा या ठिकाणी ई-शौचालये उभारण्यात आली.
मानवविरहित आणि स्वयंचलित प्रणाली ही या ई-टॉयलेटची वैशिष्ट्ये आहेत.आरमोरीत प्रथमच अशी ई-टॉयलेट उभारण्यात आली आहेत.पे अँड यूजच्या धर्तीवर त्यांचा वापर केला जातो.नाणे टाकल्यानंतर प्रसाधनगृहाचा वापर करता येईल.या टॉयलेटसाठी ४५ चौरस फूट इतकी कमी जागा लागते.पाचशे लिटर पाणी त्यात साठविलेले असते तसेच एका वेळी दीड लिटर पाण्याचा वापर होतो.त्यामुळे ई-टॉयलेट स्वच्छ व यूजर फ्रेंडली असतात.पर्यावरणच्या दृष्टीने उपकारक ई-टॉयलेटचा दरवाजा उघडताच आतील दिवे आणि एक्झॉस्ट फॅन सुरू होऊन आपोआप पाणी फ्लश होते.बाहेर पडल्यावरही सेन्सर तंत्रज्ञानाद्वारे पुन्हा संपूर्ण शौचालय स्वच्छ होते.या स्वयंचलित शौचालयात बेसीनदेखील आहे.ई-टॉयलेट ही संकल्पना तंत्रज्ञानावर आधारित आहे.स्वच्छ भारत अभियानादरम्यान शहर स्वच्छतेकडे हे एक पाऊल आहे; असे आमदार गजबे यांनी लोकार्पण सोहळा प्रसंगी सांगितले.
लोकार्पण सोहळा प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे,आरमोरी नगरपरिषदच्या मुख्याधिकारी व प्रशासक डॉ.माधुरी सलामे,भाजपा जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार,माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे,माजी आरोग्य सभापती भारतभाऊ बावनथडे,भाजपा तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, भाजपा शहराध्यक्ष विलास पारधी,सोशल मीडिया संयोजक अमोल खेडकर,खेमराजभाऊ जांबुले,इंजी. राहुल तीतीरमारे,गोविंदा भोयर,मिथुन मडावी,सुरज कारकुरवार,शुभम निंबेकर,राजू जराते,नरेश ढोरे,हेमंत कोपुलवार,इंजि.कस्तुभ रोकमवार,अविनाश बंडावार, नितीन गौरखेडे,काटेखाये,राजू कांबळे,गिरीश बांते, अविनाश गाढवे,आरमोरी नगरपरिषदेचे कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!