Monday, July 13, 2026
Homeनागपूरशिक्षकाचे विद्यार्थ्यांसोबत अभद्र व्यवहार; शिक्षकाला अटक..

शिक्षकाचे विद्यार्थ्यांसोबत अभद्र व्यवहार; शिक्षकाला अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दोन अल्पवयीन मुली आणि ११ मुलांसोबत अभद्र व्यवहार करून छेडखानी करणाऱ्या नागपूरच्या सदर येथील एसएफएस स्कूलमधील शिक्षकाला सदर पोलिसांनी शाळेच्या प्राचार्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अटक केली आहे.संकल्प वीरेंद्र मेढा वय ४७ वर्षे,रा.मेढा भवन,सेंट्रल एवेन्यू,असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.मेढा याने २०१७ मध्ये एसएफएस स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी सुरू केली.तो इंग्रजी आणि इतिहास विषय शिकवितो.सोबतच आपल्या घरी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो.
मेढा याच्या विरुद्ध एसएफएस स्कूलमधील दोन अल्पवयीन मुली आणि ११ विद्यार्थ्यांनी अभद्र बोलण्यासह,पाण्याच्या बॉटल डस्टर फेकून मारणे, पालकांबाबत विद्यार्थ्यांना आपत्तीजनक बोलणे आणि त्यांच्याशी हा शिक्षक अभद्र व्यवहार करीत असल्याची तक्रार दिली होती.
त्यानंतर २४ ऑगस्टला शाळेच्या प्राचार्यांनी तीन शिक्षकांची समिती नेमली.या समितीने शाळेतील विद्यार्थ्यांचे बयाण नोंदवून ३० ऑगस्टला याबाबत प्राचार्यांना अहवाल सादर केला.त्यावर प्राचार्यांनी मेढा याला सात दिवसात उत्तर सादर करण्यास सांगितले.
मेढा याने शिक्षकदिनी ५  सप्टेंबरला आपले उत्तर प्राचार्याकडे सादर केले.त्यानंतर एसएफएस स्कूलच्या प्राचार्यानी सोमवारी ९ सप्टेंबरला मेढा याच्या विरुद्ध सदर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
सदर पोलिसांनी आरोपी शिक्षक मेढा विरुद्ध कलम २९६,७४,११५ (२),३५२ (२),सहकलम १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली.परंतु विद्यार्थ्यांनी लावलेले आरोप चुकीचे असून एसएफएस स्कूल सोडून गेलेल्या काही विद्यार्थ्यांशी आपला वाद झाला होता.याबाबत पाचपावली ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणामुळे आपल्या विरुद्ध खोटी तक्रार करण्यात आल्याचे अटक केलेला शिक्षक मेढा याने पोलिसांना दिलेल्या बयाणात सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!