Monday, April 6, 2026
Homeकुरखेडाआमदार मसराम यांची वडेगांव आश्रमशाळेला भेट.. -विद्यार्थी बुडून मृत पावलेल्या घटणास्थळाची पाहणी...

आमदार मसराम यांची वडेगांव आश्रमशाळेला भेट.. -विद्यार्थी बुडून मृत पावलेल्या घटणास्थळाची पाहणी व शाळा व्यवस्थापनाशी‌ चर्चा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या वडेगांव येथील क्रांतीविर नारायण सिंह उईके आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या ८ वर्षीय वेदांत शंकर पदा रा.नवेझरी,ता.कुरखेडा,जि.गडचिरोली या विद्यार्थ्याचा शाळेजवळील तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.या घटणास्थळाला व आश्रमशाळेला काल,शनिवार,४ एप्रील रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी भेट देत येथील व्यवस्थेची व सोई-सुविधांची पाहणी करीत उपस्थित विद्यार्थी व शाळा प्रशासनाशी चर्चा केली.पाहणी दरम्यान आश्रमशाळेत अनेक समस्या निदर्शानास आल्या.या समस्या मार्गी लावत आदिवासी निवासी विद्यार्थांची सुरक्षितता सुनिश्चित करीत शाळेतील सोई-सुविधा व दर्जेदार शिक्षणाबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड होता कामा नये,अशी सूचना व्यवस्थापणाला केली.तसेच तात्काळ आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करीत जिल्ह्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळांच्या व्यवस्थेची तपासणी करण्याची सूचना केली.यावेळी मसराम यांनी विद्यार्थ्यांच्या शाळेलगत असलेल्या ज्या तलावात विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला,त्या तलावाची सुद्धा प्रत्यक्ष पाहणी केली.याप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कांग्रेस तालुकाध्यक्ष जिवन पाटील नाट,जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे,माजी पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम, ज्येष्ठ नेते आनंदराव जांभूळकर,माजी सरपंच संजय कोरेटी,माजी नगरसेवक उस्मान पठाण,भावेश मुंगनकर,शाळेचे मुख्याध्यापक गिरीपूंजे आदि उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दुचाकीने स्वगावी निघालेल्या कुटुंबियांवर काळाने झडप घालून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार ६ एप्रिल रोजी सायंकाळी चारच्या सुमारास चंद्रपूर...

शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अडचणीत; अंतरगाव उपकेंद्राच्या ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या अंतरगाव येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा प्रभावित झालेला आहे.दुरुस्ती करीता विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अडचणीत...

आता बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष,भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(बीपीसीएल)फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी सामंजस्य...

पत्नीने हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहीत प्रेमाची साक्ष दिली आणि उचलले टोकाचे पाऊल..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संसाराचा गाडा हाकतांना पतीसोबत तिचे वारंवार खटके उडायचे.संसारातील कलह इतका वाढला की,सततच्या भांडणांमुळे पत्नी मनातून खचली.पती-पत्नीचे पटत नसल्याने महिनाभरापूर्वीच ती आपल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!