Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरआपल्याच शाळेतील शिक्षकाला मागितली १० हजाराची लाच..! - जाळ्यात सापडताच घराची झाडा-झडती..

आपल्याच शाळेतील शिक्षकाला मागितली १० हजाराची लाच..! – जाळ्यात सापडताच घराची झाडा-झडती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका लीपिकाने आपल्याच शाळेतील शिक्षकास दुसऱ्याला पैसे द्यावे लागतात व तो व्यक्ती पैसे घेतल्याशिवाय कामच करीत नसल्याची बतावणी करून वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली.प्रकरणी लाचखोर लिपिक नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला.याप्रकरणी नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये लिपिक असल्याचे खोटे सांगणाऱ्या तोतया लिपिकाविरुद्धसुद्धा कारवाई करण्यात आली आहे. उमरेड येथील एका शाळेत कनिष्ठ लिपिक असलेला प्रवीण किसन कांबळे वय ४२ वर्षे,रा.कावरापेठ, ता.उमरेड,जि.नागपूर आणि राजेश गोपीचंद गंथाडे वय ४८ वर्षे, रा.बजेरीया, नागपूर अशी आरोपींची नावे आहेत.सहाय्यक शिक्षक विजय गोपीचंद चव्हाण वय ४२ वर्षे,रा.ड्रीम सिटी,उमरेड यांनी याबाबतची फिर्याद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविली होती. फिर्यादी विजय चव्हाण हे सन २००७ पासून सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत.२ एप्रिल २०२४ ला विजय चव्हाण यांची प्रकृती अचानक बिघडली.त्यांना उमरेड येथील एका खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार केल्यानंतर लागलीच नागपूर येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.पोटाचा आजार झाल्याने २ ते १८ एप्रिलपर्यंत औषधोपचार करण्यात आला.संपूर्ण औषधोपचाराचा खर्च १ लाख ८८,६१२ रुपये झाला.औषधोपचारासाठी केलेला खर्च शासकीय नियमावलीनुसार परत मिळण्यासाठी खर्चाबाबतचे बिल त्यांनी तयार केले.२ डिसेंबर २०२४ ला शाळेतील मुख्याध्यापक तसेच जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला गेला.या प्रस्तावात मेयो हॉस्पिटलच्या जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र नसल्याने त्रुटीसह शिक्षणाधिकारी (माध्य.)यांनी शाळेला परत पाठविला. ९ मे २०२५ पर्यंत प्रवीण कांबळे यांनी प्रस्ताव पाठविलाच नाही.पुन्हा प्रस्ताव पाठविण्यासाठी प्रवीण कांबळे यांनी शिक्षक विजय चव्हाण यांच्याकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमधील राजेश गंथाडे या बाबूला रक्कम मोजल्याशिवाय कामच होत नाही,असेही प्रवीण कांबळे याने सांगितलेव विजय चव्हाण याच्यांकडे वारंवार पैशाची मागणी केली.स्वतःचे वैद्यकीय बिल मंजुरीकरिता कोणतीही लाच रक्कम देण्याची विजय चव्हाण यांची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कनिष्ठ लिपिक प्रवीण किसन कांबळे आणि राजेश गंथाडे यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार नोंदविली. नुकतेच मंगळवार १३ मे रोजी संपूर्ण पडताळणी करण्यात आली व बुधवार १४ मे रोजी सापळा रचला.उमरेड-भिवापूर मार्गावर प्रवीण कांबळे यास १० हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उमरेड पोलिस ठाण्यात कलम ७,७ (अ) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. लागलीच प्रवीण कांबळे याच्या कावरापेठ येथील घराची झडती घेण्यात आली.त्याचा मोबाइलसुद्धा ताब्यात घेण्यात आला असून,पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान,अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रशांत केदार,हवालदार भरत ठाकूर, महेश सेलोकर,सचिन किन्हेकर,विकेश राऊत,प्रफुल्ल बांगडे,प्रिया नेवारे आदींनी सदरची कारवाई यशस्वी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!