Monday, September 21, 2026
Homeमुंबईआनंदाची बातमी... आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचेही मिळणार दीड हजार रुपये...

आनंदाची बातमी… आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचेही मिळणार दीड हजार रुपये…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना महिन्याकाठी दीड हजार रुपये दिले जात आहेत.आतापर्यंत जुलै,ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे प्रत्येकी दीड हजार रुपये म्हणजेच ४५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.अशातच आता महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींना दुप्पट भेट देण्याची घोषणा केली आहे.दिवाळीनंतर साजऱ्या होणाऱ्या भाऊबीज उत्सवानिमित्त आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही; असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता लवकरच निवडणूक आचारसंहिता लागू होऊ शकते.अशा परिस्थितीत लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोंबर महिन्यातच दिला जाईल,अशी घोषणा अजित पवार यांनी केली.त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीचे सरकार पुन्हा आल्यानंतर लाडकी बहीण योजनेअतंर्गत देण्यात येणारी रक्कम १५०० रुपयांवरून ३००० रुपये करण्यात येईल. आपल्या सरकारच्या कल्याणकारी उपक्रमांबद्दल विरोधी पक्षात एवढी ईर्षा का? असा सवाल त्यांनी केला.

लाडली बहीण योजना कोणत्याही किमतीत बंद केली जाणार नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.या योजनेसाठी निधीची कमतरता भासणार नाही; असेही ते म्हणाले,लाडकी बहीण योजने अंतर्गत दिलेल्या रकमेचा शासनाच्या इतर योजनांवर परिणाम होणार नाही; असेही अजित पवार म्हणाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!