Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजआज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देसाईगंज नगर परिषद क्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम...

आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देसाईगंज नगर परिषद क्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर ५ जून हा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.पर्यावरण समृध्दी नांदेल तर जीवसृष्टी अबाधित राहणार आहे.मात्र,काही ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे.अश्यातच पर्यावरणपूरक वृक्षांची जोड मिळाली तर पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही.याच उदात्त हेतूने आज,गुरुवार ५ जून रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून देसाईगंज नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके यांचे हस्ते स्थानिक देसाईगंज नगर परिषद क्षेत्रातील सांस्कृतिक भवन परिसरात अटल मिशन फॉर रिजुवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन योजना(AMRUT) व दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान
(DAY-NULM),कृतीसंगम व माझी वसुंधरा अभियान कार्यक्रमाअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरीत शपथ घेऊन वृक्षारोपण करण्यात आले.देसाईगंज शहरातील नगर परिषद शाळा व  इतर शासकीय परिसरातील जागेत झाडे लावणे व त्यांचे संगोपन करण्याबाबतचे उपक्रम राबविण्यास  Ministry of Housing and Urban Affair (MoHUA)यांनी निर्देशित केले आहे.या उपक्रमांअंतर्गत सबंधीत नगर परिषदेमध्ये दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंर्गत बचतगट सदस्य यांचे द्वारे झाडेलावणे व त्यांचे संगोपन करण्याचे  कामे केले जाणार आहे. सदर उपक्रम हा अमृत योजना(AMRUT) कार्यक्रमाअंतर्गत  “वुमन फार ट्रीज” (एक पेड माँ के नाम) या टॅगलाईन नुसार राबविण्यात येत आहे.या उपक्रमाअंतर्गत सबंधीत नगर परिषदेमधून समन्वयासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान नोडल अधिकारी व अमृत योजना नोडल अधिकारी यांची निवड करण्यात आली असुन सदर अधिकारी संपुर्ण कार्यक्रमांचे समन्वय साधणार आहेत.या उपक्रमाअंतर्गत सामुदायीक नागिरकांचा सहभाग,क्षमता बांधणी व प्रशिक्षण,पर्यावरणीय शिक्षण,सनियंत्रण व मुल्यांकन, शास्वतेसबंधीत पध्दती ईत्यादी बांबींवर भर देण्यात येत आहे.या उपक्रमांअंतर्गत विविध देशी व विदेशी स्थानिक पर्यावरण पुरक झाडांची लागवड ५ जून ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत करण्यात येणार आहे.आज पार पडलेल्या वृक्षारोपण प्रसंगी कार्यालय अधिक्षक प्रमोद येरणे,लेखापाल अविनाश राठोड,स्थापत्य अभियंता सौरभ नंदनवार,निशांत घोनमोडे,रचना सहाय्यक दिव्या परतेके,विद्युत अभियंता योगीता निंबार्ते,कर विभाग प्रमुख स्वप्नील हमाने,कर व प्रशासकिय अधिकारी प्रफुल हटवार,पाणीपुरवठा अभियंता आशीष गेडाम,अग्निशमन अधिकारी अनिल गोवर्धन,सहाय्यक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे, शहर समन्वयक प्रफुल दुफारे,से.नि.कर्मचारी हमीद पठाण,लिपीक रितेश येरणे,दिनकर खेत्रे,सफाई जमादार जवाहर सोनेकर,भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा कल्पना वासनिक,अंकुर महिला बचत गटांच्या कोषाध्यक्षा पुष्पा पिल्लेवान व महिला बचत गटाच्या ईतर सदस्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता समुदाय संघटक अरुण मोटघरे,सफाई कर्मचारी रवि शेंदरे,शैलेश खांडेकर, अमर शेंडे,अरविद इंदूरकर,लिडींग फायरमन राजू निंबेकर,फायरमन सुनिल नाकाडे,सफाई कामगार रवि शेंदरे,राहुल रगडे,अनुराग सारोटे,लक्की बिरहा,भारत खरकाटे,अश्वीन उईके सह अधिकारी,कर्मचारी व  महिला बचत गटाच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!