Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीअशीही एक हत्या; डोळा लागताच मारेकऱ्याने डाव साधला अन् २६ वर्षीय युवकाचा...

अशीही एक हत्या; डोळा लागताच मारेकऱ्याने डाव साधला अन् २६ वर्षीय युवकाचा जीवच घेतला.. – गडचिरोली जिल्ह्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मारेकरी वा चोर वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून विविध घटनांचा शेवट करू पाहतात.मात्र, होणारा शेवट हाच सुरुवात करीत असतो.तुम्ही कितीही क्लुप्त्या वा हतकंडे वापरा,पण क्राईम हे क्राईमच असते आणि त्याचा शेवट तीच सुरुवात असते.अश्याच प्रकारे गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात मन हेलावणारी घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवारच्या रात्री घडली व काल बुधवारी ४ जूनच्या सकाळी उघडकीस आली.एका २६ वर्षीय युवकाची झोपेतच गळा दाबून अज्ञाताने हत्या केली.गळ्यावर व्रण आढळून आल्याने त्याची गळा आवळून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.सदरची घटना सिरोंचा तालुक्यातील लांबडपल्ली गावात घडली असून २६ वर्षीय राजकुमार दुर्गया दुर्गम असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.घटनेच्या दिवशी सदर तरुण गावातीलच घराशेजारी लग्न असलेल्या घरी हळदीच्या कार्यक्रमास ३ जूनच्या रात्री गेला होता.अश्यातच त्याच रात्री घरी परतला व झोपी गेला.४ जून रोजी लग्न समारंभ असल्याने ३ जूनच्या रात्री संपूर्ण गाव व राजकुमार दुर्गम याच्या घराजवळील लोक व्यस्त होते.याच संधीचा फायदा घेत राजकुमार याचा डोळा लागताच मारेकऱ्याने डाव साधला आणि गळा दाबून हत्या केली.सकाळच्या सुमारास कुटुंबीयांनी राजकुमारला उठविण्याचा प्रयत्न केला असता,शरीराची हालचाल करीत नसल्याने व गळ्यावर व्रण दिसून आल्याने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला.घटनेने एकच खळबळ उडाली असून खुनामागील गूढ कायम आहे.मृत राजकुमार दुर्गम हा मजुरीकाम करायचा,त्याचे कोणाशी वैर नव्हते,त्यामुळे त्याची हत्या कोणी व कशासाठी केली,याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.याबाबत सिरोंचा ठाण्यात अज्ञात इसमावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास सिरोंचा पोलीस ठाण्याचे ठाणेदार समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धोत्रे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!