Monday, April 27, 2026
Homeनागपूरआजीवन कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या..

आजीवन कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-पत्नीच्या हत्येप्रकरणी आजन्म(आजीवन) कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या एका ५४ वर्षीय कैद्याने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अंडरवेअरच्या (अंतर्वस्त्राची इलास्टिक)इलास्टिकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.तुळशीराम शेंडे असे मृतक कैद्याचे नाव असून भंडारा न्यायालयाने त्याला पत्नीच्या हत्ये  प्रकरणात ३० जून २०२४ रोजी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती.नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील ‘छोटी गोल बैरक’ परिसरात असलेल्या ‘रंग काम विभाग’जवळील गोदामाजवळ एका खिडकीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.त्याने आपल्या अंडरवेअरच्या इलास्टिकचा वापर फास तयार करण्यासाठी केला होता.सदरची बाब कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच धंतोली पोलिसांना कळविण्यात आले.तुळशीराम शेंडे याने त्याच्या पत्नीची हत्या केल्याने भंडारा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.तुळशीरामला भेटायला सुरुवातीला नातेवाईक यायचे.पण,मागील दोन ते तीन वर्षात  त्याला कोणी भेटायला गेले नाही.यामुळे नैराश्यातून तुळशीरामने स्वतःचे आयुष्य संपवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

शासन निर्णयात जरी पोपट पक्षीचा उल्लेख नसेल; तरीही एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही.. – आता पोपट पक्षांनी नुकसान केल्यास मिळणार भरपाई..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्याने शेतात डाळिंबाची झाडे लावली.पण,अर्ध्याहून अधिकच्या झाडांची फळे ही पोपट पक्षांनी खाऊन नष्ट केली होती.अश्यातच शेतकऱ्याने कृषी विभागास माहिती देऊन पंचनामा...

रखरखत्या उन्हात लग्नसमारंभासाठी प्रवास; बसमध्येच सोडला प्राण.. – आज उष्णतेच्या लाटेचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या स्थितीत नागपूरसह विदर्भाचे तापमान वाढतच आहे.एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असून अंगाची लाहीलाही होत आहे.एप्रिल महिन्यातच ही स्थिती आहे,तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!