Wednesday, July 29, 2026
Homeनागपूरआजपासून १२ वी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध..

आजपासून १२ वी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-फेब्रुवारी-मार्च २०२५ ला होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचे विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र आजपासून म्हणजेच १० जानेवारीपासून बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून,त्यांची प्रिंट काढून कोणतेही वेगळे शुल्क न घेता विद्यार्थ्यांना द्यावे; असे आदेश मंडळाने दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक,प्राचार्य,शिक्षक,विद्यार्थी व पालक यांना सूचित करणारे १२ वी परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतचे परिपत्रक मंडळाच्या सचिवांकडून काल गुरुवारी जाहीर करण्यात आले.इयत्ता १२ वीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या
www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर आज शुक्रवारपासून Admit Card या लिंकद्वारे डाउनलोड करता येतील,महाविद्यालयांनी ही प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.यात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ‘एक्स्ट्रा सिट नं.ॲडमिट कार्ड’ या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव,आईचे नाव,जन्मतारीख अशा दुरुस्त्या असल्यास सदर दुरुस्त्या ऑनलाइन पद्धतीने करावयाच्या असून त्याकरिता ‘Application Correction’ ही लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.विहित दुरुस्ती शुल्क भरून दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात याव्यात.विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर ‘Correction Admit Card’ या लिंकद्वारे सुधारित प्रवेशपत्र उपलब्ध होतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा कारागृहात कैद्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली यांच्या राष्ट्रीय विषाणूजन्य यकृतदाह नियंत्रण कार्यक्रम(NVHCP) अंतर्गत जिल्हा खुले कारागृह,गडचिरोली येथे आरोग्य जनजागृती, वैद्यकीय तपासणी...

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!