Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीआमदार रामदास मसराम यांची गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट.. - विधानसभा क्षेत्रासह...

आमदार रामदास मसराम यांची गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट.. – विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी आज,गुरुवारी ९ जानेवारीला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची पाहणी करीत रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबाबत रुग्णांशी संवाद साधून आस्थेने विचारपूस करीत माहिती जाणून घेतली.त्यानंतर आरोग्याशी संबंधित इतर समस्यांवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी कीलनाके यांच्याशी चर्चा करून समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात; अशी मागणी केली.
कोरची,कुरखेडा,आरमोरी आणि देसाईगंज या ठिकाणी रुग्णवाहिका सेवा तातडीने उपलब्ध करून द्यावी,जेणेकरून गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळू शकणार,अपंग प्रमाणपत्रांसाठी योग्य असेसमेंट प्रक्रिया राबविण्यात यावेत,ज्यामुळे अपंग व्यक्तींना वेळेत प्रमाणपत्रे मिळतील.रक्तपेढीच्या सुविधांबाबत ब्लड स्टोरेज कुरखेडा आणि देसाईगंज येथे सुरू करण्याची गरज व्यक्त केली.तसेच जिल्ह्यातील आरोग्य केंद्र-उपकेंद्र,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात; जेणेकरून रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच रेफर करण्याचे प्रमाण कमी व्हावे; असे प्रसंगी आमदार रामदास मसराम यांनी जनतेच्या आरोग्य संबंधित विविध बाबींवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी कीलनाके यांचेशी हितगुज साधून रुग्णांच्या हितावह चर्चा करून लवकरात लवकर प्रश्र्ने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!