- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-आदिवासी शैक्षणिक विकास संस्था कुरखेडा संचालित आंचिव हायस्कूल चिखली येथील इयत्ता ८ व्या वर्गातील विद्यार्थी नाशिक मुकेश साखरे रा.आंधळी(नवरगाव)ता.कुरखेडा याने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक(NMMS) परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश प्राप्त केल्याने शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सदरच्या शिष्यवृत्ती अंतर्गत त्याला दरमहा एक हजार रुपये असे चार वर्ष शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्षा कोचे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यध्यापक एम.एन.डहाडे, सहाय्यक शिक्षक मुंगमोडे,म्हरस्कोल्हे,शिक्षिका कु.राखडे,कुभैसारे, शिक्षक नागपुरे,लिपिक पी.के. मेश्राम,शिपाई नामदेव बागडे,कांता मडावी सह मार्गदर्शक शिक्षक रामटेके यांच्या वतीने सत्कार करीत अभिनंदन करण्यात आले. नाशिकच्या यशाने संस्था,शाळा तसेच गावाचे गौरव वाढवले असल्याने संस्थेकडून तसेच ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
- Advertisement -

