- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यातच नव्हे तर सगळीकडेच अवैध सावकारी करणाऱ्यांनी धुमाकूळ घालून गरजू नागरिकांच्या गळ्यात फास आवळला आहे.शहरी भागासह आता ग्रामीण भागातही अवैध सावकारी सुरू झाली आहे.अवैध सावकारी म्हणजे,सावकारी करण्याची शासनाकडे कुठल्याही प्रकारची नोंदणी नसणे.साध्या भाषेत सांगायचे झाले तर ज्यांच्याकडे अवाक्याच्या बाहेर पैसा गोळा आहे व त्या पैश्याचे आता काय करावे म्हणून गरजू लोकांना वेळेवर कर्ज स्वरूपात रक्कम दिली जाते. पण,अश्याप्रकरे देण्यात येणारी रक्कम बेकायदेशीर आहे.महाराष्ट्र सावकारी (नियमन)अध्यादेश २०१४ नुसार परवानाधारक सावकारांना काही अटी आणि नियम निश्चित केले असून परवाना मिळण्याची पद्धतही निश्चित केली आहे.परवानाधारक सावकारांनी केलेल्या सर्व व्यवहारांची हिशेब पुस्तके,नोंदवह्या ठेवणे त्यांच्यावर बंधनकारक असून अशा सावकारास कर्जदारांकडून मुद्दलापेक्षा जास्त व्याज घेता येणार नाही.तसेच व्याजावर व्याज लावता येणार नाही.शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या व्याजदरानुसारच तारण व विनातारण कर्जव्यवहार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.तसेच कर्जदाराने मागणी केल्यास कर्जखाते उतारा सावकाराने देणे आवश्यक आहे.मात्र,आम्हाला याची कुठलीही माहिती वा वेळेवर रक्कम मिळत असल्याने कोण तेवढी भानगड लावून घेणार? असे करण्यात येते.पण,अवैध सावकारी करणारे देणाऱ्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने रक्कम वसूल करून नियमांना बगल देत आहेत.त्यामुळे सावकाराकडून फसवणूक अथवा उपद्रव होत असल्यास सहकार विभाग वा नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून अवैध सावकारी करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार नोंदविणे आवश्यक झाले आहे.अश्याच प्रकारे चंद्रपुरात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची जमीन,घरे,प्लॉट व जंगम मालमत्ता बळकावणाऱ्या अवैध सावकारांच्या चंद्रपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून आरोपींच्या तब्बल ५० मालमत्ता जप्त केल्या आहेत.यात सुनीता सोमाणी,राधिका सोमाणी, ऋषिराज सोमाणी,रोहित सोमाणी,अजय संघवी, प्रीती सिंघवी,स्तुती सोमाणी,अशोक ठक्कर अशी आरोपींची नावे असून आरोपी अद्याप फरार आहेत.प्रकरणी भारतीय दंड विधानाचे कलम ४२०,४६५,४६७, ४७१,४७४,३४,१२० (ब),महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम ३९,४५,तसेच नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ (क) आणि एमपीआयडी कायदा १९९९ अंतर्गत कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशोक ठक्कर याच्याविरुद्ध दुर्गापूर पोलिस ठाण्यातही फसवणूक व अवैध कर्ज दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे.
प्रकरणात मनी लॉड्रिंगचाही प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीच्या खात्यात ६६ लाख रुपये बेकायदेशीरपणे ट्रान्सफर केल्याचे प्रकरण समोर आले.सदरचा घोटाळा कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.आतापर्यंत आरोपींकडून ६३ बेकायदेशीर मालमत्ता व्यवहार आढळून आले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील एखाद्या नागरिकाची अवैध सावकारी करणाऱ्यांकडून फसवणूक झाली असल्यास अश्यांनी आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथे सर्व कागदपत्रांसह हजर राहून लेखी तक्रार दाखल करावी,असे आवाहन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक-९५९४०८३१४१- सचिन यादव.
- Advertisement -

