Thursday, September 3, 2026
Homeभंडाराअवैध रेती भरलेल्या टिप्परचा पाठलाग; उपविभागीय अधिकाऱ्याचे वाहन उलटले..

अवैध रेती भरलेल्या टिप्परचा पाठलाग; उपविभागीय अधिकाऱ्याचे वाहन उलटले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांना मिळताच त्यांनी एका अवैध रेतीने भरलेल्या टिप्परचा पाठलाग करतांना तिसऱ्याच व्यक्तीने बोलेरो वाहन मधोमध आणून कारवाईत अडथळा आणल्याने वळण मार्गावरील शेतात  उपविभागीय अधिकाऱ्यांचे वाहन उलटून अपघात घडल्याची घटना आज,गुरुवार ९ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दवडीपार ते पचखेडी स्मशानभूमी रस्त्यावर घडली.यात उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे आणि त्यांचे पती किरकोळ जखमी झाल्याने त्यांचेवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकरणी एमएच ३६ एएल २८५३ क्रमांकाच्या बोलेरो वाहन व एमएच ३६ एए ४१०६ क्रमांकाच्या टिप्पर वाहन चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०९,१३२, ३(५),३०३(२),जमीन महसूल कायद्याच्या उपकलम ४८ आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या उपकलम ७ आणि ९ अंतर्गत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.घटनेचा पुढील तपास एपिआय प्रशांत साखरे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!