Wednesday, June 3, 2026
Homeकुरखेडाअल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा आरोपी अटकेत…-कुरखेडा शहरातील घटना…

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा आरोपी अटकेत…-कुरखेडा शहरातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली):- कुरखेडा शहरातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आझाद वार्ड निवासी शुभम सुरेश जौसीया वय २७ वर्षे या युवकाला काल, शनिवारी २० जुलैच्या दुपारी २ वाजता अटक करण्यात आली.

२७ वर्षीय युवक शहरातील एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत मागील काही महिन्यांपासून लैंगिक शोषण करीत होता.सदर बाब तिच्या कुटुंबीयांना कळताच पोलिसांत धाव घेत युवका विरोधात पोलीस स्टेशन कुरखेडा येथे तक्रार दाखल केली.तक्रारीवरून आरोपी शुभम याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता ६४(१),६४(२) एमआय.,६५ तसेच पोस्को कायदा ४,६,८,१०,१२ अन्वये गून्हा दाखल करण्यात आला.मात्र,आरोपीला गुन्हा दाखल झाल्याची कूणकूण लागताच तो फरार झाला होता. यावेळी पोलीसांनी तत्परता दाखवत दोन दिवसातच गोपनीय सूत्रांच्या आधारे त्याला अटक केली.घटनेचा पुढील तपास ठाणेदार महेन्द्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे व पोलीस हवालदार शेखलाल मडावी करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!