Sunday, April 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तछत्रपती शिवरायांची वाघनखे ठरली सर्वांचे आकर्षण..-वाघनखे पाहण्यासाठी परिसरात दिवसभर गर्दी…

छत्रपती शिवरायांची वाघनखे ठरली सर्वांचे आकर्षण..-वाघनखे पाहण्यासाठी परिसरात दिवसभर गर्दी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन काल,शनिवारी खुले करण्यात आले.या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला,ती वाघनखे सर्वांचे आकर्षण ठरली.शनिवार हा सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली होती.यावेळी विद्यार्थी व नागरिक शिवकालीन शस्त्रांचे बारकाईने निरीक्षण करत होते.तसेच शस्त्रांची माहितीही टिपत होते.ज्या दालनात वाघनखे ठेवली आहेत,त्या परिसरात दिवसभर गर्दी होती.छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात शिवकालीन वस्तूंची विविध दालने तयार करण्यात आली आहेत. या दालनांत विविध शिवकालीन वस्तू पाहण्यात सातारकर दंग झाले होते.शस्त्रास्त्रांसह मोगलांशी झालेल्या युद्धाप्रसंगी खजिन्यावर ताण पडू नये म्हणून वतनी मुलखातून रक्कम जमा करण्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र व पाटीलकी बहाल करणारे पत्रही विद्यार्थी न्याहाळत होते.छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच अन्य शिवकालीन वास्तू ठेवण्यात आल्या आहेत.शिवरायांचा पुतळा,वस्तू व विविध पत्रे पाहताना विद्यार्थी आणि नागरिकांना सेल्फी टिपण्याचा मोह आवरला नाही.प्रत्येक जण आपल्या मोबाईलवर फोटोसेशन करीत होते.असे वृत्त पुढारीने दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!