Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजअभय गँगचा उच्छाद; आमगाव व सावंगीच्या चोर घाटातून अवैध रेतीची तस्करी..! -...

अभय गँगचा उच्छाद; आमगाव व सावंगीच्या चोर घाटातून अवैध रेतीची तस्करी..! – अधिकारी,कर्मचारी निलंबित होऊनही धाक ना दरारा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध रेती प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांपासून ते तहसीलदार,मंडळ अधिकारी तसेच तलाठ्यांवर कारवाईचा बडगा उगारून काहींना निलंबित केले,तर काहींवर चौकशीचे आदेश देऊन गुन्हे दाखल करण्याचे फर्मान सोडले.यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आणि अनेकांना धडकी भरली. अश्यातच महसूल मंत्र्यांनी केलेल्या कारवाईचा “ना धाक राहिला,ना दरारा” राहिल्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील आमगाव व सावंगीच्या वैनगंगा नदी पात्रातील चोर रेती घाटांमध्ये दिसून येत आहे.या ठिकाणी अभय गँगने अवैध रेती चोरीचा जो उच्छाद मांडलाय तो संपता संपेना.! अभय गँगला आमगाव आणि सावंगी वैनगंगा नदी पात्र जणूकाही रेतीचे उत्खनन व वहन करण्यासाठी खुले करून देण्यात आले की काय? असे चित्र निर्माण झाले आहे.
अवैध रेती चोरीचा खेळ दिवसा आराम करायला सांगतो,तर रात्रीच्या अंधारात खुलेआम राजरोसपणे तस्करीत सक्रिय सहभाग घ्यायला लावतो.सावंगी वैनगंगा नदी पात्रातील चोर रेतीघाट हा सहजासहजी कुणाच्याही लक्षात येत नसल्याने तस्करीत माहीर असलेले चोर पावलांनी बाहेरच्या बाहेर रेतीची विक्री करून विल्हेवाट लावतांना दिसून येतात.मात्र,रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारा पांदन रस्ता गाठला, तर चोर पोलीसांचा खेळ पटकन लक्षात येऊ शकतो. आमगाव येथील अवैध रेतीचा खेळ हा “ताल से ताल मिला” असे करून चुप्पी साधली जाते.विशेष म्हणजे, अवैध रेती चोरीत माहीर असलेले कुणाचे तोंड कसे बंद करायचे आणि आपली पोळी कशी शेकून घ्यायची,अशी अनोखी कला त्यांच्यात कुटून भरलेली आहे.नाव न लिहिण्याच्या अटीवर एकाने सांगितले की,अवैध रेती चोरट्यांमुळे आज रेतीचे भाव उतरले असून सदरची रेती देसाईगंज शहरात,ग्रामीण भागात तसेच भंडारा,गोंदिया व इतर क्षेत्रात खुलेआम जात आहे.एवढा मोठा अवैध रेतीचा खेळ सुरू असतांनाही महसूल विभाग गप्प कां? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!