Saturday, July 18, 2026
Homeगडचिरोलीअस्सल ग्रामीण खाद्य पदार्थांची चव चाखायचीय तर जिल्हा स्तरीय ‘सरस’ महोत्सवास द्या...

अस्सल ग्रामीण खाद्य पदार्थांची चव चाखायचीय तर जिल्हा स्तरीय ‘सरस’ महोत्सवास द्या भेट.. -भामरागड,एटापल्ली,कोरची या दुर्गम आदिवासी भागांतील पारंपरिक खाद्यपदार्थ राहणार विक्रीसाठी उपलब्ध..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला स्वयंसहायता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा स्तरीय ‘सरस’ विक्री व प्रदर्शनीचे आयोजन उद्या, मंगळवार २३ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा परिषद कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे करण्यात आले आहे.या विक्री व प्रदर्शनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ६० महिला स्वयंसहायता गटांचे स्टॉल सहभागी होणार असून,महिलांनी स्वहस्ते तयार केलेल्या विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री येथे केली जाणार आहे. यामध्ये मध,जांभूळ व सिताफळ प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ,मोहापासून बनवलेले विविध खाद्यपदार्थ,लाकडी शोभेच्या वस्तू,कुक्कुटपालन व मत्स्यपालनाशी संबंधित उत्पादने यांचा समावेश आहे. तसेच पीएमएफएमई योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योगांना चालना देणारी उत्पादनेही येथे उपलब्ध असतील.या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनांचे शहरी बाजारपेठेतील विक्री अनुभव मिळणार असून,लघुउद्योगांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न उमेद अभियानांतर्गत सुरू आहेत.प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी संस्कृतीचे दर्शन शहरी नागरिकांना घडणार आहे.
प्रदर्शनात महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेली लोणची,चटण्या,लाकडी हस्तकला वस्तू, वनउपजापासून निर्मित खाद्यपदार्थ,ग्रामीण कलाकुसरीची उत्पादने, घरगुती मसाले,पापड,कुरडई तसेच इतर स्वादिष्ट पदार्थांचे स्टॉल असतील. यासोबतच सावजी मटन, बंगाली फिश,बंगाली स्वीट्स,तसेच भामरागड, एटापल्ली,कोरची या दुर्गम आदिवासी भागांतील पारंपरिक खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.या ‘सरस’ विक्री व प्रदर्शनामुळे ग्रामीण नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळणार असून,नागरिकांना अस्सल ग्रामीण चव चाखण्याची व खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सदर महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम २६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या जिल्हा स्तरीय भव्य ‘सरस’ विक्री व प्रदर्शनाला जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!