- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून सोने आणि चांदी ही दोन्ही मौल्यवान धातू भाव वाढीत एकमेकांची साथ सोडत नसल्याचे दिसून येत आहे. सराफा बाजारात आज,सोमवार २२ डिसेंबर रोजी सोने आणि चांदीच्या भावांनी एक नवीन उच्चांक गाठला आहे.चांदीच्या भावात ७ हजार २१४ रुपये प्रति किलोची मोठी वाढ झाली आहे,तर सोन्याच्या भावात १ हजार १९० रुपयांची वाढ झाली आहे.जीएसटीसह चांदी आता २ लाख १३ हजार ७७६ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.तर २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ३७ हजार ५९१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.शुक्रवारी चांदीचा दर जीएसटीशिवाय २ लाख ३३६ रुपये प्रति किलो आणि सोने जीएसटीशिवाय १ लाख ३२ हजार ३९४ रुपये प्रति १० ग्रॅम होते.अश्यातच आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात सोने जीएसटीशिवाय १ लाख ३३ हजार ५८४ रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहचले आहे.दुसरीकडे,चांदी जीएसटीशिवाय २ लाख ७ हजार ५५० रुपये प्रति किलो दराने उघडली.या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या दरात ५७ हजार ८४४ रुपयांची तर चांदीच्या दरात १ लाख २१ हजार ५३३ रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे.सोने-चांदीचे दर हे आयबीजेएद्वारे (IBJA)जाहीर करण्यात आले आहेत,ही संस्था दिवसातून दोनदा दर प्रसिद्ध करत असते.
- Advertisement -

