- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुनिश्र्वर बोरकर
गडचिरोली :-काहीकाळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने अपघातात एका महिला मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर दोन महिला मजूर गंभीर जखमी असून अन्य महिलांना गंभीर दुखापत झाल्याची घटना २१ डिसेंबरच्या रात्री गडचिरोली-तेलंगणा सीमेजवळ घडली.यात चंद्रपूर जिल्ह्यातील मिनाबाई अनिल लाटेलवार वय ५० वर्षे,
रा.चांदली(बुज),ता.सावली या महिलेचा जागीच मृत्यु झाला,तर निलाताई मंडरे रा.दिघोरी व विमलताई सोयाम रा.बेंबाळ या दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे. त्याचबरोबर,३७ वर्षीय विकास टेकाम सह अन्य महिला मजुरांना गंभीर दुखापत झाल्याने या सर्वांना रात्रीच्या सुमारास तेलंगणा येथील रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले.
माहितीनुसार,चंद्रपूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातील जवळपास १५ ते २० महिला मजूर
तेलंगणा राज्यात रोवणीच्या कामाकरीता पिकअप वाहनाने निघाल्या होत्या.तेलंगणा सीमेजवळ जातच काहीजणांनी लघु शंकेसाठी पिकअप थांबवले.तितक्याच भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने पिकअप वाहनाला मागून जोरदार धडकी दिली.धडक इतकी भीषण होती की अचानक घडलेल्या घटनेने सर्वजण गोंधळले.यात एक महिला मजूर जागीच ठार झाल्याने उपस्थित महिलांनी एकच आक्रोश केला.लागलीच मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून रुग्णवाहिकेस पाचारण करून जखमींना तात्काळ तेलंगणा येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. घटनेने मजूर महिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
- Advertisement -

