Saturday, July 18, 2026
Homeगडचिरोलीस्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन..

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात अर्ज करुन देखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे आणि विदयार्थ्यांना भोजन,निवास,निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणेकरीता शासनाने १३ जुन २०१८ च्या सुधारीत शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे.सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ घेणेकरीता विद्यार्थ्यांना वस्तीगृहात व स्वाधार योजनेचे लाभ घेणेकरीता विद्यार्थ्यांना वस्तीगृहात व स्वाध्याय योजनेचे अर्ज करणेकरीता एकच ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात अर्ज करुनदेखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही.अशा विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीव्दारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता ग्राह्य धरले जावून नियमानुसार पुढील पडताळणीसाठी संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगीन वर अग्रेशित केले जातील.सदर माहिती पोर्टलवरील लॉगीनमध्ये विद्यार्थ्यांनी परिपूर्ण भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सदर माहिती अपुर्ण भरल्यास सदर अर्ज अपात्र करण्यात येईल व त्यासाठी सर्वस्वी विद्यार्थी जबाबदार राहील,याबाबत नोंद घेण्यात यावी.
अर्ज करण्याकरीता ऑनलाईन पोर्टल-https://hmas.mahait.org हे असुन स्वाधार योजनेकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,गडचिरोली यांचेकडे ऑनलाईन अर्ज करण्यात यावे,असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,गडचिरोली डॉ.सचिन मडावी यांनी केले आहे. सदर योजनेच्या ठळक निकषामध्ये विद्यार्थी पात्र ठरत नसल्यास अश्या विद्यार्थ्यांचे अर्ज थेट अपात्र ठरविण्यात येईल,असेही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!