- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्यात अवैध रेती तस्करीला मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे.रेतीतस्करांसोबत मिळून अनेकांचे हात ओले होत असल्यानेच रेती तस्करी फोफावली आहे.अशातच तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार मोहन टिकले यांना भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार ९ एप्रिल रोजी निलंबित केले आहे.एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होऊनही रेती तस्करी थांबण्याचे नावच घेत नाही.त्यातच आज,सोमवार २८ एप्रिलला सकाळच्या सुमारास रेतीचा उपसा करतांना अचानकपणे वाघ उपसा करणाऱ्या तस्करांच्या दिशेने येत असल्याचे निदर्शनास येताच ट्रॅक्टर सोडून जो-तो वाट मिळेल त्या दिशेने धूम ठोकून पळू लागला.सदरची घटना तुमसर तालुक्यातील चांदमारा येथील बावनथडी नदीपात्रातील असून चांदमारा गावाजवळून बावनथडी नदी वाहते.दोन राज्यांची सीमा असलेल्या नदीपात्रात मध्य प्रदेशातील व महाराष्ट्रातील रेती तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रंदिवस अवैध रेतीचा उपसा सुरू आहे.गेल्या दोन दिवसांपासून अनेकांना वाघोबाचे दर्शन होऊ लागले आहे.अशातच आज सोमवारी सकाळच्या सुमारास अवैध रेतीचा उपसा सुरू असतांनाच एका मजुराला नदीपात्राकडे वाघ येत असल्याचे दिसून आला.वाघ दिसताच नदीपात्रात असलेल्या रेती तस्करांची एकच घाबरगुंडी झाली.त्यामुळे बनेल त्या दिशेने पळापळ सुरू झाली. काही रेतीतस्कर मध्यप्रदेशाच्या दिशेने पळाले तर काही महाराष्ट्राच्या दिशेने.रेती तस्करांची संख्याबळ आणि आवाज पाहून वाघाने आता आपलेही काही खरे नाही,म्हणून माघार घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
- Advertisement -

