Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजअखेर जुनी वडसा येथील बौद्ध बांधवांचे स्वप्न होणार साकार .! ...

अखेर जुनी वडसा येथील बौद्ध बांधवांचे स्वप्न होणार साकार .! – दोन टप्प्यात २० लक्ष रुपयाच्या सभागृह बांधकामास प्रशासकिय मंजुरी प्रदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-अतिशय गरीब शेतकरी व कामगार बंधूंची बौद्ध वस्ती असलेल्या देसाईगंजच्या जुनी वडसा येथील संबोधी बुद्ध विहार येथे बौद्ध धम्माचे सांस्कृतीक कार्यक्रम पार पाडण्याकरिता सभामंडप बांधण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजरतन मेश्राम यांच्या माध्यमातुन संबोधी बुद्ध विहाराच्या सदस्यांनी तत्कालिन आमदार क्रिष्णा गजबे यांना निवेदन सादर केले होते.त्यावेळी गजबे यांनी आपल्या स्थानिक विकासनिधितुन १० लक्ष रुपयाचा निधी मंजुर करुन दिला.मात्र,सदरचा निधी अपुरा असल्याने राजरतन मेश्राम सनिर बोदेले,प्रशांत सुर्यवंशी , लालचंद सहारे,ताजुल उके,विक्की राऊत,महिला सदस्या वंदना सहारे,मालता राऊत,रेखा गणविर , समता खोब्रागडे यांचेसह बौद्ध समाज बांधवांनी वेळोवेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके,माजी आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे सभागृह बांधकामासाठी निधीची पुर्तता करावी, यासाठी निवेदन सादर केले.त्या अनुषंगाने नुकतेच सभामंडप बांधकामासाठी १० लक्ष रुपयाच्या अतिरिक्त निधीची पुर्तता करण्यात आली असुन दोन टप्प्यात एकूण २० लक्ष रुपयाच्या सभागृह नांधकामास प्रशासकिय मंजुरी प्रदान करण्यात आली असल्याने सभागृह बांधकामातुन धम्मकार्य पार पाडण्यासाठी तसेच बौद्ध धम्मसंस्कार केन्द्र निर्मितीस मदत होईल,असा आशावाद समाजबांधवांनी व्यक्त केला.प्रसंगी देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके यांचे समाज बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करत पुष्पगुच्छ देऊन सत्कार  करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!