- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात घरफोडी व इतर सहा गुन्ह्यंतर्गत शिक्षा भोगत असलेला भंडारा येथील रहिवासी २३ वर्षीय कैदी हर्ष महेंद्र रामटेके अखेर दोन दिवसांनी पोलिसांच्या हाती लागला आहे.
नागपूर मेडिकलमध्ये उपचार सुरू असतांना शनिवारच्या मध्यरात्री त्याने मेडिकलमधून पलायन केले होते.प्रकृती बिघडल्याने रामटेकेला मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक-३६ मध्ये दाखल करण्यात आले होते.शनिवारी १७ मे २०२५ रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास त्याने पलायन केले. सीसीटीव्ही फुटेज बघितल्याने सदर प्रकरण पुढे आले होते.त्याने काळे पट्टे असलेला चमकदार गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातलेला होता.अश्यातच सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली होती. पळून जाण्याच्या वेळी एक गार्ड खुर्चीवर बसलेला होता.त्याने आरोपीला अडवण्याचा कोणताही प्रयत्न केला नव्हता.मुख्य दरवाजा उघडतांना रामटेके अडखळला होता.नंतर जोरात दरवाजा खीचल्याने तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता.सदरची घटना नागपूर शहरात वाऱ्यासारखी पसरली होती व घटनेबाबत व्हिडिओ व्हायरल होताच कारागृह,मेडिकल रुग्णालय आणि पोलिस यंत्रणेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानुसार पोलिसांचे दोन पथक त्याच्या मागावर होते. अखेर आज,सोमवार १९ मे रोजी कैदी हर्ष रामटेके याला पकडण्यात नागपूरच्या अंजनी पोलिसांना यश आले आहे.
- Advertisement -

