Wednesday, July 15, 2026
Homeकुरखेडाअखेर कुरखेडा येथील काँग्रेसचे बेमुदत उपोषण आंदोलन मागे.. - दोन खरेदी केंद्रे...

अखेर कुरखेडा येथील काँग्रेसचे बेमुदत उपोषण आंदोलन मागे.. – दोन खरेदी केंद्रे सुरू; आमदार मसरामांनी घेतली दखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील शासकीय रब्बी(उन्हाळी)धान खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावे,या मागणीला घेऊन काल, सोमवारी १९ मे रोजी दुपारी १२ वाजता पासून कुरखेडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते.सदर आंदोलनाची दखल आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी घेत आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एस.एस.सांबरे यांनी उपोषणस्थळी भेट घेऊन आंदोलकांशी चर्चा करीत तात्काळ दोन खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याचे व इतर केंद्रे टप्प्या-टप्याने सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याच दिवशी म्हणजेच काल सोमवारच्या रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मागे घेण्यात आले.
काल सोमवारी दुपारी १२ वाजेपासून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे अद्यापही सुरू न झाल्याने खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या धानाची कमी किंमतीत खरेदी करून लूट होत असल्याने तातडीने शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू करावे,या मागणी करीता आंदोलन सुरू करण्यात आले होते.यावेळी प्रथम तहसीलदार रमेश कुंभरे व महामंडळाचे उपप्रादेशीक व्यवस्थापक सावळे यांनी आंदोलन स्थळाला भेट देत आंदोलकांशी चर्चा केली.मात्र, त्यांच्या आश्वासनाने आंदोलकांचे समाधान होऊ शकले नाही.यावेळी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने लगेच सांयकाळी ६ वाजता आमदार रामदास मसराम यांनी आंदोलनस्थळी भेट देत भ्रमनध्वनीवर आदिवासी विकास महामंडळ नाशीक येथील जनरल मॅनेजर किरन गाडे व मुंबई मंत्रालयात कार्यरत जि.एम.राजश्री सारंग यांचाशी चर्चा केली व येथील परीस्थीती व शेतकऱ्यांचा बळावत असलेला रोष त्यांच्या लक्षात आणून दिला.यानंतर लगेच त्यांनी महामंडळाचे गडचिरोली येथील प्रादेशिक व्यवस्थापक एस.एस.सांबरे यांना तातडीने आंदोलन स्थळावर पाचारण केले.रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते आंदोलनस्थळी पोहचत आमदारांच्या मध्यस्थीने चर्चा सुरू करण्यात आली.यावेळी शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेत आज,मंगळवार २० मे रोजी पलसगड व गोठणगांव हे दोन शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा करीत इतर केंद्रे सुद्धा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.प्रसंगी प्रादेशिक व्यवस्थापकांच्या हस्ते आंदोलकांना निंबू शरबत पाजून आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी आंदोलक कुरखेडा तालुका कांग्रेस अध्यक्ष जिवन पाटील नाट,जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे,माजी जि.पं.सदस्य प्रभाकर तुलावी,पुंडलीकराव आकरे, माजी सभापति गिरीधर तितराम,माजी पं.स.सदस्य धर्मदास ऊईके,युवक कांग्रेस अध्यक्ष प्रांजल धाबेकर, भावेश मुंगणकर,आनंदराव जांभूळकर,लालचंद धाबेकर,नगर पंचायत सभापति आशिष काळे, नगरसेवक जयेन्द्रसिंह चंदेल,माजी नगरसेवक उस्मान खान,दामोदर उईके,खूशाल बन्सोड,संदेश कोटागंले आदि उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!