Friday, September 4, 2026
Homeगोंदियासावधान..! कर्ज घेणाऱ्यांची हमी घेऊ नका; कर्ज घेणारा सुटला अन् हमी घेणाराच...

सावधान..! कर्ज घेणाऱ्यांची हमी घेऊ नका; कर्ज घेणारा सुटला अन् हमी घेणाराच आरोपी बनला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-व्यवसायासाठी अनेकजण कर्ज घेतांना दिसून येतात.कुणी राष्ट्रीयकृत बँकेतून तर कुणी पतसंस्था वा इतर ठिकाणांहून कर्ज उचलून व्यवसाय करीत असतात.कर्जाची रक्कम मोठी असल्यास कर्जदाराचे गॅरंटर म्हणजेच हमी घेणारा आवश्यक असतो.कारण की,जर कां कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने कर्जाची रक्कम परतफेड न केल्यास हमी घेणाऱ्यास जबाबदार धरले जाते व केव्हा-केव्हा हमी घेणाऱ्याकडूनही रक्कम वसूल केली जाते.मात्र, नुकतेच गोंदिया शहरातील कर्ज घेणारा व हमी घेणारा यांचे प्रकरण उघडकीस येताच अनेकजण अवाक् राहिले.एकाने कर्ज उचलले तर दुसऱ्याने हमी घेऊन चेक दिला.चेक दिला खरी,पण तो बँकेत वटलाच नाही.कारण खात्यात पर्याप्त रक्कमच नव्हती.त्यामुळे हमी घेणाऱ्यास मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी तीन महिन्यांचा कारावास तसेच धनादेशाची रक्कम दोन महिन्यांच्या आत देण्याचे आदेश दिले आहे.
सदर प्रकरण असे की,गोंदिया शहरातील  आईपीसीसीएस अर्बन मल्टीस्टेट को.ऑप. सोसायटीकडून कर्जदार बिपीन बोधानी यांनी मोबाइल शॉपीसाठी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.त्याने मासिक व्याजासह कर्ज फेडण्याचे मान्य केले होते.या प्रकरणातील आरोपी दीपक पृथ्यानी हा या कर्जात गॅरंटर (हमी घेणारा) होता.मुदतीत कर्जाची परतफेड न झाल्याने पतसंस्थेने एक लाख नऊ हजार ४८४ रुपयांचा धनादेश २६ जुलै २०२१ रोजी बँकेत लावला.परंतु बँकेत पर्याप्त रक्कम नसल्याने तो धनादेश वटविण्यात आला नाही.परिणामी त्या संस्थेने कर्जदाराला नोटीस बजावली.कर्जदाराने त्या नोटीसचे उत्तरही दिले नाही.त्यामुळे कर्ज देणाऱ्या संस्थेने न्यायालयात धाव घेतली.न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून या प्रकरणात हमी घेणाऱ्या दीपक पृथ्यानी यांस तीन महिन्यांचा कारावास व कर्जाची घेतलेली रक्कम दोन महिन्यांच्या आत त्या संस्थेला देण्याचे आदेश दिले.ही सुनावणी मुख्य न्याय दंडाधिकारी अभिजित कुळकर्णी यांनी केली.या प्रकरणात संस्थेचे वकील म्हणून ॲड.डी.टी.वैरागडे यांनी जबाबदारी पार पाडली. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला दोन महिन्यांत ती रक्कम आईपीसीसीएस अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.सोसायटीला द्या,असे ठणकावून सांगितले. जर ती रक्कम दोन महिन्यांच्या आत संस्थेला न दिल्यास आणखी अतिरिक्त तीन महिन्यांच्या शिक्षेचे आदेश दिल्याने हमी घेणाऱ्यास मोठा हादरा बसला आहे.त्यामुळे एखाद्याची हमी घेतांना विचार करूनच पुढचे पाऊल टाका; अन्यथा कर्ज घेणारा सुटला अन् हमी घेणाराच आरोपी बनला.! अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!