Friday, May 22, 2026
Homeदेसाईगंजअंगावर वीज कोसळून अख्खे कुटूंबच ठार झालेल्या मृतकांच्या कुटुंबीयांना १६ लाख रुपयांची...

अंगावर वीज कोसळून अख्खे कुटूंबच ठार झालेल्या मृतकांच्या कुटुंबीयांना १६ लाख रुपयांची तात्काळ मदत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील दुग्ध डेअरी (तुळशी फाटा) जवळ वीज पडून अख्खे कुटूंबच ठार झाल्याची घटना २४ एप्रिल २०२३ ला सायंकाळ ५ वाजताच्या सुमारास घडली.भारत लक्ष्मण राजगडे वय ३२ वर्षे संगीतकार रा.आमगांव व त्यांची पत्नी अंकिता भारत राजगडे वय ३० वर्षे  दोघेही पती-पत्नी आपल्या दोन्ही लहान मुलांसह गरगळा येथुन लग्न लावून येत असतांना मार्गातच हलक्या पावसाची सुरुवात होऊन वीज कडाडने सुरू झाले.वीज कडाडत असल्याने राजगडे यांनी दुग्ध डेअरी जवळील एका झाडाच्या खाली आसरा घेतला असता अचानक वीज अंगावर पडल्याने राजगडे कुटूंबातील चारही जण जागीच मृत्युमुखी पडले होते.घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे,उपविभागीय अधिकारी लोंढे, तहसीलदार महाजन यांनी मृतकाच्या कुटुंबियांना सांत्वन देत दोन दिवसांतच शासकिय तरतुदीची प्रक्रिया पुर्ण करुन प्रति मृतकांना ४ लाख रुपये प्रमाने ४ मृतकांचे १६ लाख रुपयांचा धनादेश मृतकाची आई पुष्पा लक्ष्मन राजगडे,बहिण अंजु गडपायले,प्रिती केळझरकर,स्मिता भोसकर यांना बहाल करण्यात आला आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!