Wednesday, July 22, 2026
Homeगडचिरोलीॲड.पी.डी.काटकर चौतिसाव्या नाट्यश्री कविता स्पर्धेतील विजयी...

ॲड.पी.डी.काटकर चौतिसाव्या नाट्यश्री कविता स्पर्धेतील विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.
या उपक्रमाचे चौत्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३४ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी ॲड.पी.डी.काटकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “स्वप्नमय वास्तव” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे; असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
पुंडलिक धर्माजी काटकर हे गडचिरोली येथील  प्रसिद्ध कवी असून ते ‘माणिकपूत्र’ या टोपणनावाने कविता लिहीतात.त्यांचे ‘मुल्य संस्कार गीते’ व ‘कळा या लागल्या जीवा’ हे कवितासंग्रह प्रकाशित असून, ‘असाही एक जोडीदार’ कादंबरी, ‘कथा आणि व्यथा’ कथासंग्रह, व ‘जीवनगाणी’ हा काव्य संग्रह  प्रकाशनाच्या मार्गावर आहे.‌त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.विविध पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
त्यांच्या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
चौतिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने जयराम धोंगडे, कृष्णा कुंभारे,प्रेमिला अलोने,मधुकर दुफारे,संगीता ठलाल,सुभाष धाराशिवकर,राजेंद्र यादवराव सोनटक्के,वामनदादा गेडाम,पुनाजी कोटरंगे,  तुळशीराम उंदीरवाडे,केवळराम बगमारे,अजय राऊत, ज्योत्स्ना बन्सोड,रोहिणी पराडकर,संगीता रामटेके, मुरलीधर खोटेले,माधुरी आमृतकर,पुरुषोत्तम दहिकर, कृष्णा कुंभारे,प्रिती ईश्वर चहांदे,वकिल शेख,रेखा दिक्षित,वसंत चापले,पी.डी. काटकर,डॉ.मंदा पडवेकर, वंदना सोरते,विलास टिकले,सुरेश गेडाम,सोनाली रायपुरे,उकंडराव नारायण राऊत,शैला चिमड्यालवार, पुरुषोत्तम लेनगुरे,खुशाल म्हशाखेत्री,मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!