Monday, August 31, 2026
Homeनागपूर८० वर्षीय आजीबाईने विभागीय आयुक्तांपुढे व्यक्त केला संताप... - मुलाने अंगठ्याचे...

८० वर्षीय आजीबाईने विभागीय आयुक्तांपुढे व्यक्त केला संताप… – मुलाने अंगठ्याचे ठसे घेवून घर व दुकान स्वत:च्या नावावर करुन घेतले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मुलाने अंगठ्याचे ठसे घेवून घर व दुकान
स्वत:च्या नावावर करुन घेतले.डोक्यावरचे छप्पर गेले, रहायला जागा नाही.कुठे आसरा घेणार! असा संताप जरीपटका भागातील भोजवंताबाई शेंडे वय ८० वर्षे यांनी विभागीय आयुक्तांपुढे व्यक्त केला.या प्रकरणातील पोलीस चौकशी व सद्यस्थितीची माहिती घेवून संबंधित प्राधिकरणास अर्ज करण्यास सांगत तात्काळ मदतीसाठी विभागीय आयुक्तांनी आजीबाईंना सोबत कर्मचारी देत उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठविले.
विभागीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने आज १२ ऑगस्ट रोजी तीन तक्रारी प्राप्त झाल्या.आजीबाईंचा प्रश्न विभागीय लोकशाही दिनाशी संबंधित नव्हता, तरीही तो समजून घेवून त्यावर उचित तोडगा काढून दिलासा देण्यात आला.संबंधित पोलीस उपायुक्तांकडून माहिती घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या.जेष्ठ नागरिक निर्वाह अधिनियमांतर्गत आजीबाईंना मदत देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी नागपूर शहराच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना थेट दूरध्वनीहून सूचना केल्या.
राज्य शासनाने माता-पिता व जेष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ लागू केला आहे. त्यामध्ये माता-पित्यांच्या व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण यासाठी हमी दिली आहे.या कायद्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाचे अथवा माता-पिता यांना मूलभूत गरज व सुविधा त्यांची मुले देत नसल्यास अगदी त्यांना आई-वडिलांकडून प्राप्त मालमत्तेचे हस्तांतरण सुद्धा रद्द करण्यासंदर्भात या कायद्यात तरतूद आहे. तसेच मासिक निर्वाह भत्ता प्राप्त करण्यासाठी सुद्धा तरतूद करण्यात आली आहे.
तत्पूर्वी,भंडारा जिल्ह्यातील कोटांगले येथील नागरिकाची जुनी तक्रार आणि नागपूर महानगरपालिकेसंबंधित आलेल्या दोन तक्रारी आजच्या विभागीय लोकशाही दिनात समोर आल्या. पहिल्या तक्रारीत प्रशासनाकडून मुद्देनिहाय उत्तर मागविण्यात आले.या तक्रारीशी संबंधीत तलाठी व नायब तहसिलदार उपस्थित होते तर तक्रारदार अनुपस्थित होते.नागपूर मनपा संदर्भातील तक्रारीबाबत विभागीय आयुक्तांनी मनपात तक्रारदाराची एक आठवड्याच्या आत निराकरण करण्याचे आदेश दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!