Wednesday, June 10, 2026
Homeभंडारा२४ वर्षीय गरोदर मातेचा गर्भातील बाळासह मृत्यू; समाजमन सुन्न..

२४ वर्षीय गरोदर मातेचा गर्भातील बाळासह मृत्यू; समाजमन सुन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-एका २४ वर्षीय नऊ महीन्याच्या गरोदर मातेचा गर्भातील बाळासह तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने समाजमन सुन्न झाल्याची घटना २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास उघडकीस आली.भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या आष्टी येथिल सुनिता दुर्गेश सोयाम वय २४ वर्षे असे मृत गरोदर महीलेचे नाव आहे.
सुनिता सोयाम या नऊ महिन्यांच्या गरोदर महीलेला एक दिवसा अगोदर तिला प्रसुतीच्या कळा आल्या होत्या.दरम्यान,तिच्या पतीने सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी येथे उपचारासाठी दाखल  केले होते.अशातच डॉक्टरांनी तिच्या प्रसुतीला वेळ आहे म्हणून घरी पाठविले होते.दरम्यान,दुसऱ्या दिवशी सुनिताला प्रसुतीच्या तिव्र वेदना झाल्या. त्यावेळी उपचारार्थ तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.येथिल डॉक्टरांनी तिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.परंतु उपचारादरम्यान गरोदर महीलेच्या गर्भातील नऊ महीन्याच्या बाळासह मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.सदर घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.सदर गरोदर महीलेचा मृत्यू हा प्रसुती कळा येत असतांना हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज येथिल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असला तरी नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!