- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई संस्थेच्या वतीने नुकताच एक दिवसीय वार्षिक पुरस्कार सोहळा देवाची आळंदी जिल्हा पुणे येथे पार पडला.संस्थेच्या वतीने आयोजित अक्षरमंच राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सहभागी होऊन सलग दोन वर्षे सर्वोत्कृष्ट काव्य लेखनाबद्दल गडचिरोलीचे मिलींद बी.खोब्रागडे यांना “अष्टपैलू काव्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.सदरचा सोहळा संतांची भूमी असलेल्या “देवाची आळंदी” जिल्हा पुणे येथे संपन्न झाला.सदर सोहळ्यास संस्थेचे संस्थापक शिवाजी खैरे,अनुसया खैरे,जागतिक किर्तीचे जेष्ठ साहित्यिक व मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा उत्साहात पार पडला.सोहळ्यास विविध मान्यवर तथा अक्षरमंचचे सर्व कार्यकारी समिती तसेच अनेक राज्यभरातून आलेले ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते.प्रसंगी मिलिंद खोब्रागडे यांना यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देत मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.
- Advertisement -

