Monday, September 7, 2026
Homeगोंदिया२३ वर्षीय तरुणाचा जलाशयात आढळला मृतदेह..

२३ वर्षीय तरुणाचा जलाशयात आढळला मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचा तिबेट कॅम्प जवळील इटियाडोह जलाशयात मृतदेह आढळून आल्याने कुटुंबियांना  मोठा धक्का बसला आहे.आशिष जितेंद्र मेश्राम वय २३ वर्षे, रा.बोंडगावदेवी,ता.अर्जुनी-मोरगाव, जि.गोंदिया असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव असून तो रंगपंचमीच्या दिवशी गावातील मित्रांसोबत मौज-मजा करण्यासाठी घराबाहेर पडला होता.त्याच्या सोबत असलेले मित्र घरी परतले,मात्र आशिष रात्र होऊनही घरी परतला नसल्याने काल गुरुवारी त्याच्या वडिलांनी स्थानिक पोलिस ठाण्यात आशिष बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.तत्पूर्वी वडील जितेंद्र व मोठा भाऊ प्रशिक यांनी नातेवाईकांकडे शोध घेतला होता. मात्र,त्याचा कुठेही थांगपत्ता लागलेला नव्हता. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता मृतक आशिष कुठे गेला होता व कुणासोबत होता,याचा मागोवा घेत असतांनाच इटियाडोह जलाशयात तिबेट कॅम्प जवळ त्याचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.प्रकरणी पोलीस प्रशासन त्या दिशेने तपास करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!