- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यात २१ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.सदरची खळबळजनक घटना आज,गुरुवार १० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे उघडकीस आली.अशातच मृत युवकाच्या जवळच आणखी एक युवक बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने नागरिकांकडून तर्क-वितर्क लावले जात आहेत.प्रज्वल नवले वय २१ वर्षे रा.गडचांदूर असे मृतावस्थेत आढळून आलेल्या युवकाचे नाव आहे तर नागेश लांडगे वय २१ रा.गडचांदूर हा बेशुद्ध अवस्थेत सापडला आहे.सदर घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी कदम पथकासह घटनास्थळी दाखल झाले.घटनेची पाहणी करून पोलीस कर्मचाऱ्यांनी मृताचा पंचनामा केला. तत्पूर्वी बेशुध्द युवकास चंद्रपूर सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.सदर दोन्ही युवक गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मागील परिसरात आढळून आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
- Advertisement -