Sunday, August 30, 2026
Homeनागपूर१५ वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती; आरोपी प्रियकरास अटक..

१५ वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती; आरोपी प्रियकरास अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका २४ वर्षीय तरुणाची ओळख सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी झाली.दोघात इंस्टाग्रामवर चॅटिंग सुरू झाली. चॅटिंग नंतर मैत्री झाली आणि प्रेम बहरून आले.यात दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित झाले आणि अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने प्रकरण पोलिसात पोहोचले.प्रकरणी भिवापूर पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करून वर्धा जिल्ह्यातून अटक केली आहे.अनिकेत डहाके वय २४ वर्षे, रा.आंतरगाव,ता.समुद्रपूर,जि.वर्धा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पीडित मुलगी १५ वर्षाची असून,चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.वर्षभरापूर्वी तिची अनिकेतसोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली.चॅटिंगमुळे दोघेही एकमेकांच्या जवळ आले.त्याने तिला विश्वासात घेत भिवापूर शहरात बोलावले आणि शहरातील अर्णव गोल्ड ओयो हॉटेलमध्ये तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले.काही दिवसांनी तांत्रिक कारणामुळे आईला संशय आला आणि ती गर्भवती असल्याचे तिच्या लक्षात आले. आईने तिला विश्वासात घेत विचारपूस केल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला.त्यानंतर,आई व मुलीने तीन दिवसांपूर्वी भिवापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.याप्रकरणी भिवापूर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता(बीएनएस)कलम ६४(१),६४ (२)(आय), ६४(२) (एम),६५(१),६९ पोक्सो कलम ४ (२),६,१२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली व न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.प्रकरणाचा पुढील तपास भिवापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!